शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवास @ २५००

By admin | Updated: June 16, 2016 04:28 IST

बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्यामुळे यापुढे एक तासाच्या उड्डाणासाठी प्रवाशांना २,५00 रुपये भाडेच द्यावे लागेल.

नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्यामुळे यापुढे एक तासाच्या उड्डाणासाठी प्रवाशांना २,५00 रुपये भाडेच द्यावे लागेल. प्रादेशिक विमान उड्डाणासाठीचे शुल्क यापुढे किमान असेल आणि हेलिकॉप्टरच्या संचालनासाठीही सरकार नवे नियम तयार करणार आहे. तसेच विमान कंपन्यांना सध्या असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. या धोरणामुळे २०२२ पर्यंत भारत जगातील तिसरे सर्वात मोठे विमान वाहतूक केंद्र होईल, असा विश्वास नागरी विमानमंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला आहे. विमान वाहतूक क्षेत्रात जी वाढ होत आहे, त्याचा लाभ घेण्यावरही जोर देण्यात आला आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू म्हणाले की, हे धोरण नवी दिशा देणारे ठरेल. तब्बल आठ महिने या धोरणावर विचारविनिमय करण्यात आला आहे. मंत्रालयाने आॅक्टोबर २०१५ मध्ये याबाबतचा संशोधित मसुदा जाहीर केला होता. याबाबत टिष्ट्वट करताना राजू यांनी म्हटले आहे की, आमूलाग्र बदलासाठी हे धोरण निर्णायक ठरेल. सन २०२२ पर्यंत भारत जगातील तिसरे सर्वात मोठे नागरी विमान वाहतुकीचे केंद्र असेल. त्यासाठी आम्हाला योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)विमान वाहतूक धोरणाची वैशिष्ट्ये ...- भारतीय एअरलाइन्सच्या विदेशात उड्डाणासाठी किमान ५ वर्षांचा आणि 20 विमानांचा नियम. - प्रादेशिक विमान उड्डाणाला कमी शुल्क.- विमान कंपन्यांना मालाच्या चढ-उतारासाठी मंजुरी. - हेलिकॉप्टरच्या संचालनासाठी सरकार नवे नियम. - प्रादेशिक विमान सेवा वाढविण्यासाठी एक तासाच्या उड्डाणाकरिता विमानभाडे २५०० रुपये निश्चित. धोरणाचे स्वागत : विमान वाहतूक धोरणाचे स्वागत. या धोरणात एक तासाच्या प्रादेशिक प्रवास भाड्यावर २५00 रुपयांचे बंधन घातल्याने अनेक नवीन शहरे हवाईमार्गे जोडली जातील. सध्याच्या प्रवासासाठीही ही सवलत असेल, हा गैरसमज आहे. विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी असलेल्या अटी रद्द करणे हे आतापर्यंतच्या धोरणाला अनुसरून आणि या क्षेत्राच्या वृद्धीसाठी आवश्यकच आहे. मात्र या वाढीसाठी लागणारी हवाई आणि विमानतळांवरील वाहतुकीच्या नियमनाची तयारी केली आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे क्षेत्र २00४ साली सर्वांसाठी खुले केल्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे आणि विमान कंपन्या ही त्याचीच उदाहरणे आहेत. - प्रफुल्ल पटेल, माजी विमान वाहतूकमंत्री