शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

नारीशक्तीला एअर इंडिया करणार अनोखा सलाम

By admin | Updated: March 6, 2016 03:37 IST

८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असून, त्याच्या दोन दिवस आधी एअर इंडियाकडून नारीशक्तीला अनोख्या पद्धतीने सलाम करण्यात येणार आहे. ६ मार्चला एअर इंडियाचे विमान दिल्लीहून उड्डाण

मुंबई : ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असून, त्याच्या दोन दिवस आधी एअर इंडियाकडून नारीशक्तीला अनोख्या पद्धतीने सलाम करण्यात येणार आहे. ६ मार्चला एअर इंडियाचे विमान दिल्लीहून उड्डाण करून सॅन फ्रॅन्सिस्कोचा सर्वांत लांब हवाई पल्ला गाठणार आहे आणि या विमानातील वैमानिकासह सर्व कर्मचारी दल महिलाच असणार आहेत, हे विशेष.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीचा महिला दिन एअर इंडियाने वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. दिल्लीहून सॅन फ्रॅन्सिस्कोला जाणाऱ्या विमानातील चारही वैमानिक व इतर कर्मचारी महिला असण्याबरोबरच फ्लाईट डिस्पॅचर व फ्लाईट इंजिनीअरही महिलाच असतील. एवढेच नव्हे, तर लाईन सेफ्टी महिलेकडून केली जाणार आहे, तसेच चिफ फ्लाईट सेफ्टी (एअर इंडिया) हरप्रीत एडी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सेफ्टी आॅडिट करण्यात येणार आहे. हेही कमी म्हणून की काय विमानावरील लोड आणि ट्रिम स्टाफही महिलाच असावा, अशीही योजना करण्यात आली आहे.दरवर्षी आम्ही विमानांसाठी महिला कर्मचारी सज्ज करून महिला दिन साजरा करीत असतो. या वर्षी मात्र प्रथमच थोडा वेगळा विचार करून सर्वांत लांब हवाई पल्ल्याच्या विमानाचा कर्मचारी दल संपूर्णपणे महिलाच ठेवण्याचे ठरविले आहे. या कामगिरीनंतर अर्थातच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे सिंग यांनी सांगितले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एअर इंडियाची महिला वैमानिक संघटनेशी चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी महिला दिनानिमित्त एअर इंडियाने संपूर्ण महिला कर्मचारी दल असलेली चार आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमाने चालवली होती. दिल्ली-मेलबॉर्न आणि मुंबई-मस्कत-मुंबई ही आंतरराष्ट्रीय विमाने व मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-जोधपूर-मुंबई ही विमाने मागील वर्षी पूर्णपणे महिलांनीच संचलित केली होती.