शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

एअरबसची दिल्लीत २७५ कोटींची गुंतवणूक

By admin | Updated: March 19, 2016 01:39 IST

विमाननिर्मिती क्षेत्रातील प्रसिध्द युरोपियन कंपनी एअरबस भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच ४ कोटी डॉलर्स (सुमारे २७५ कोटी रूपये) गुंतवणार आहे.

नवी दिल्ली : विमाननिर्मिती क्षेत्रातील प्रसिध्द युरोपियन कंपनी एअरबस भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रात लवकरच ४ कोटी डॉलर्स (सुमारे २७५ कोटी रूपये) गुंतवणार आहे. या गुंतवणुकीतून दिल्ली राजधानी क्षेत्रात (एनसीआर) एक अद्ययावत पायलट प्रशिक्षण, तसेच विमान दुरुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा एअरबसचा इरादा आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारत आहे, अशी माहिती एअरबसच्या भारत विभागीय शाखेचे अध्यक्ष श्रीनिवासन द्वारकानाथ यांनी पत्रकारांना दिली.प्रशिक्षण केंद्र्राचा प्रारंभ २0१७ मध्ये होणार असून, २0१८ ते २0२८ या १0 वर्षांत या केंद्राद्वारे एअरबसच्या ८ हजार प्रशिक्षित पायलटस्चे तसेच २ हजार विमान दुरूस्ती अभियंत्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असेल. एअरबस कंपनीतर्फे संचलित या केंद्रात एअरबस उद्योगातील जागतिक विशेषज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणार्थींना ए ३२0 विमानांच्या संपूर्ण उड्डाण प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवातीला ४ सिम्युलेटर्स स्थापन केले जाणार असून कालांतराने त्यांची संख्या वाढवली जाईल. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे भारताच्या कौशल्य विकास क्षेत्रात तर लक्षणीय भर पडेलच, याखेरीज विमान उद्योगाच्या जागतिक दराच्या तुलनेत भारताच्या हवाई क्षेत्राची बाजारपेठही दुप्पट गतीने वाढेल, असा दावा श्रीनिवासन यांनी केला आहे.(विशेष प्रतिनिधी)- एअरबसच्या अंदाजानुसार २0३४ पर्यंत भारताला १६00 पेक्षा अधिक प्रवासी व मालवाहतूक विमानांची गरज भासणार आहे. त्यासाठी जसे प्रशिक्षित पायलटस् हवेत, त्याचबरोबर प्रशिक्षित विमान दुरूस्ती अभियंत्यांचीही गरज भासणार आहे. - एअरबस कंपनीच्या अपेक्षेनुसार येत्या दहा वर्षात प्रत्येक सप्ताहाला साधारणत: एक याप्रमाणे भारताला एअरबस विमान पुरवले जाईल. उच्चतम गुणवत्ता असलेल्या प्रशिक्षणाची त्यासाठी गरज आहेच. - भारत सरकारने गेल्यावर्षी सुरू केलेल्या स्कील इंडिया उपक्रमानुसार या प्रशिक्षण केंद्राचा दिल्लीत प्रारंभ होत असून त्याला उत्तम यश व प्रतिसाद मिळेल, असे मत श्रीनिवासन यांनी व्यक्त केले आहे.