शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवे सरकार आल्यानंतर रशियाशी प्रथमच चर्चा

By admin | Updated: June 19, 2014 03:53 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर भारत व रशियादरम्यान पहिली उच्चस्तरीय चर्चा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री ओ रोगोजिन यांच्यादरम्यान पार पडली.

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नवे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर प्रथमच भारत व रशियादरम्यान पहिली उच्चस्तरीय चर्चा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व रशियाचे उपपंतप्रधान दिमित्री ओ रोगोजिन यांच्यादरम्यान पार पडली. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार व ऊर्जा सुरक्षेच्या मुद्यांसह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर बोलणी करण्यात आली. रोगोजिन दोन दिवसांच्या भारतभेटीसाठी येथे आले होते. या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती पुतीन यांच्यादरम्यान होणाऱ्या वार्षिक संमेलनाच्या तयारीवरही स्वराज व रोगोजिन यांनी बोलणी केली.आर्थिक सहकार्य, ऊर्जा सुरक्षितता व कुडनकुलम विद्युत प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या रिअ‍ॅक्टरच्या संचालनावरही यावेळी चर्चा करण्यात आली. सैद्धांतिक रूपाने रशियाने भारताच्या अण्वस्त्र जबाबदारी कायद्याकरिता सहमती दर्शविली असून, यामुळे या प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या समझोत्यावर हस्ताक्षराचे मार्ग खुले झाले आहेत.रशियाचे उपपंतप्रधान गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. तसेच संरक्षणमंत्री अरुण जेटली व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याही भेटीचा कार्यक्रम त्यांनी निश्चित केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)