शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत सरकार स्थापनेवरून भाजपात काथ्याकूट

By admin | Updated: July 21, 2014 02:16 IST

सुमारे तासभर चाललेल्या या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उपाध्याय यांनी सांगितले की, सरकार स्थापनेसाठी आम्हाला तूर्तास कुठलेही निमंत्रण आलेले नाही़ जे काही होईल

नवी दिल्ली : दिल्लीत सरकार स्थापनेसाठी भाजपात काथ्याकूट सुरूच असून याच प्रयत्नांतर्गत आज रविवारी राज्याचे नवनियुक्त पक्ष प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली़ दिल्लीत सरकार स्थापण्याचे फार मोठे आव्हान नाही, हे त्यांनी राजनाथसिंह यांना सांगितल्याचे समजते़सुमारे तासभर चाललेल्या या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उपाध्याय यांनी सांगितले की, सरकार स्थापनेसाठी आम्हाला तूर्तास कुठलेही निमंत्रण आलेले नाही़ जे काही होईल, राज्यघटनेच्या चौकटीत केले जाईल़ नायब राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळालेच तर आम्ही पुढील निर्णय घेऊ़विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला आणखी पाच आमदारांची गरज आहे़ हा आकडा कसा जमवणार? असे विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देणे टाळले़ सत्ता स्थापनेचे निमंत्रण मिळाल्यानंतरच भाजपा या प्रश्नाचे उत्तर देईल, असे ते म्हणाले़७० सदस्यीय दिल्ली विधानसभेत भाजपाला ३१ आणि भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलास १ अशा ३२ जागा मिळाल्या आहेत़ तर आम आदमी पार्टीला २८, काँग्रेसला ८ तसेच अपक्ष आणि जदयूला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे़ भाजपाच्या ३१ आमदारांपैकी तीन आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने तीन जागा रिक्त झाल्या आहेत़ त्यामुळे आता ६७ आमदार राहिल्याने सत्तास्थापनेसाठी भाजपाला ३४ जागा हव्या आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)