शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेनमध्ये दारू प्यायल्याने लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेवाची तुरूंगात रवानगी

By admin | Updated: April 9, 2016 14:29 IST

ट्रेनमध्ये मित्रासह दारू प्यायल्यामुळे एका व्यक्तीला स्वत:च्याच लग्नाच्या एक दिवस आधी तुरूंगात जावे लागल्याची घटना बिहारमध्ये घडली

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ९ - बिहारमध्ये १ एप्रिलपासून दारूबंदी लागू करण्यात आली असून या बंदीचे उल्लंघन करणा-या एका व्यक्तीला जोरदार फटका बसला आहे. ट्रेनमध्ये मित्रासह दारू प्यायल्यामुळे एका व्यक्तीला स्वत:च्याच लग्नाच्या एक दिवस आधी तुरूंगात जावे लागल्याची घटना बिहारमध्ये घडली.
मनदीप सिंग असे त्या तरूणाचे नाव असून तो मूळचा पंजाब येथील आहे. गुरूवारी रात्री मनदीप स्वत:च्या लग्नासाठी मित्रासह पश्चिम बंगालमधील असनसोल येथे जात होता. दुस-या दिवशीच लग्न असल्यामुळे भलताच खुश असलेला मनदीप मित्रासह हावड्याला जाणा-या पंजाब मेलच्या एसी कोचमध्ये बसून दारू पीत होता. 
मात्र त्यांची गाडी बिहारच्या दानापूर येथे पोहोचताच इतर प्रवाशांनी नोंदवलेल्या तक्रारीमुळे रेल्वे पोलिसांनी ट्रेनमध्ये चढून मनदीपला त्याच्या मित्रासह दारू पिण्याच्या आरोपाखाली अटक करत त्या दोघांची रवानगी तुरूंगात केली. 
त्यामुळे स्व:तचे शानदार लग्न व रिसेप्शनची स्वप्न पाहणा-या मनदीपला तुरूंगावारी भोगावी लागली.