शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: November 15, 2015 21:13 IST

ग्रामस्थांचे हाल : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना असून फायदा नाही

ग्रामस्थांचे हाल : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना असून फायदा नाही
पाईट : दोन-दोन नळ-पाणीपुरवठा योजना शिवाय भामाआसखेड धरण उशाला तरीही कोरड घशाला अशी अवस्था पाईट येथील ग्रामस्थांची झाली आहे. ऐनदिवाळीमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागली आहे.
पाईट येथे नियोजनाचा अभाव आणि वीज वितरण कंपनीकडून पुरेशा दाबाने मिळत नसलेली वीज यामुळे येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल झाले आहेत.
पाईटकरांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रथम सन २००९-१० मध्ये ६३ लाख रुपयांच्या इंडो-जर्मन नळ-पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेमधून सुरुवातीस पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत होता. परंतु विहीर ते पाण्याची टाकी हे अंतर ५ किमी असून सुरुवातीस ६ तास पाण्याची टाकी भरण्यास लागत असलेला वेळ लाईनमधील दुर्लक्षित पाण्यामुळे व लाईन काही लोकांनी घेतलेल्या जोडमुळे आता आठ तासांतही भरत नसल्याने खरी समस्या निर्माण झाली आहे. खरे तर ग्रामपंचायतीने या समस्येकडे लक्ष दिले असते, तरीही ग्रामस्थांना योग्य दाबाने पाणी मिळाले असते.
या योजनेवर खरे तर या योजनेच्या दुरुस्तीवर लक्ष द्यावयाची गरज असताना ८ महिन्यांपूर्वी २९ लाख रुपयांची दुसरी योजना करून पाण्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु ही योजना असून नसल्यासारखी झाली असून या योजनेमधून फक्त वापरण्यासाठी पाणी आणण्याचा उद्देशही सफल झाला नाही. एक वर्षानंतरही या योजनेचे अजून वीजजोड ग्रामपंचायतीने घेतला नसल्याने या योजनेचा काहीही उपयोग झाला नसल्याचे उघड होत आहे.
चौकट
अद्याप तक्रार नाही आली
८ महिन्यांच्या आतच या योजनेने काही पाईप जमीन सपाटीकरणामध्ये तुटले असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. तसेच लवकरच दुरुस्त करून ती लाईन पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगण्यात येत असले तरीही याबाबत तक्रार मात्र केली नसल्याचे ग्रामसेवकाने सांगितले आहे. यामध्ये सर्वात मोठे दुर्दैव असे, की कोणीही येवो पाईटकरांच्या पिण्याच्या पाण्याचा शाप असल्याची भावना ग्रामस्थांची झाली असून ऐन सणासुदीत ग्रामस्थांवर पाण्यासाठी धावपळ करायला लागते ती लागतेच.
याबाबत गेल्या १० तारखेपासून वीजवितरणकडून लोडशेडिंग बंद असले तरी मध्ये मध्ये ट्रीप होत असलेल्या लाईनमुळेही थोडाफार परिणाम होत आहे. याबाबत ग्रामसेवक सुरेश घनवट यांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी बसविण्यात आलेल्या यंत्रणा व्यवस्थित न बसविल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास अडचण येत असून एक ज्यादा कर्मचारी लावून तो लवकरच सुरळीत करण्यात येईल, असे सांगितले.
कोट
१० तारखेपासून लोडशेडिंग बंद असून नळ-पाणीपुरवठा असलेल्या फिडरला काल थ्री फेज लाईन नसतानाही ४ तास वीजपुरवठा सोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही ग्रामपंचायतीस हवे ते सहकार्य वीजमंडळ करेल.
- आर. असोले, उपअभियंता, वितरण कंपनी