शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आडवाणींविरुद्धच्या बाबरी खटल्याचा फैसला मेपूर्वी?

By admin | Updated: March 23, 2017 00:49 IST

लालकृष्ण आडवाणी, उमा भारती यांच्यासह भाजपा व संघ परिवारातील अनेक ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध बाबरी मशिद पाडली

नवी दिल्ली : लालकृष्ण आडवाणी, उमा भारती यांच्यासह भाजपा व संघ परिवारातील अनेक ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध बाबरी मशिद पाडली जाण्याच्या संदर्भात फौजदारी कट कारस्थानाचा खटला चालवायचा की नाही यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्याआधी होण्याचे संकेत बुधवारी मिळाले.सत्र न्यायालयाने या नेत्यांविरुद्धचा कट कारस्थानाचा आरोप काढून टाकला होता व अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानही नंतर हा निर्णय कायम केला होता. सीबीआयने याविरुद्ध केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.हे अपील ६ मार्च रोजी न्या. पी. सी. घोष व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आले, तेव्हा आम्ही कट कारस्थानाचा आरोप पुन्हा ठेवण्याचा विचार करू, असे न्या. नरिमन यांनी बोलून दाखविले होते.बुधवारी हे अपील न्या. घोष व नव्याने नियुक्त झालेले न्या. दीपक गुप्ता या वेगळ््याच खंडपीठापुढे सुनावणीसाठी येणार असल्याचे बोर्डावर दाखविले गेले. यावरून ही सुनावणी करणारे खंडपीठ ऐनवेळी बदलले असा अर्थ काढून त्यावरून तर्कवितर्कही सुरू झाले.प्रत्यक्षात न्या. घोष व न्या. गुप्ता यांच्यापुढे प्रकरण पुकारले गेले, तेव्हा खंडपीठ बदललेले नाही व सुनावणी आधी ठरलेल्या खंडपीठापुढेच होईल हे स्पष्ट झाले. हे प्रकरण ‘पार्टहर्ड’ आहे. खंडपीठावरील माझे सहकारी (न्या. नरिमन) आज (उपलब्ध) नसल्याने सुनावणी तहकूब करावी लागेल, असे न्या, घोष म्हणाले.यावर आडवाणी यांच्या वतीने उभे राहिलेले ज्येष्ठ वकील के. के. वेणुगोपाळ यांनी सुनावणी चार आठवडे तहकूब करण्याची विनंती केली. तसे केले तर मग सुनावणी मे महिन्यात जाईल, असे म्हणून न्या. घोष यांनी ही विनंती ्मान्य करून सुनावणी उद्या २३ मार्च रोजी घेण्यात येईल, असे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)