शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

आयसीसीआरसाठी अडवाणींनी बांधले बाशिंग

By admin | Updated: August 25, 2014 23:37 IST

ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या प्रतिष्ठित परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. करणसिंग यांनी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, या पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे.ही परिषद ज्यांच्या अखत्यारीत येते त्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी ही परिषद नेतृत्वहीन झाल्याची माहिती पंतप्रधानांना दिली आहे. ही परिषद न गुंडाळता पुनर्रचना करण्याचे संकेत मोदींनी दिले आहेत. संभाव्य नावांवर चर्चा झाली की नाही, ते अद्याप कळू शकले नाही. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी या प्रतिष्ठित परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोदींसोबत झालेल्या एका बैठकीत हे पद अडवाणी यांना द्यावे, असे सुचविले होते.डॉ.करणसिंग यांना सामावून घेताना संपुआने हाच मार्ग निवडला होता.किरण खेर यांचे नावही चर्चेतअध्यक्षपदासाठी चंदीगडच्या खासदार किरण खेर यांच्यासह एका माजी विदेश सचिवाचे नावही चर्चेत आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही. संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्षपद अडवाणींना दिले जाणार होते, मात्र त्यांनी नकार दिल्यामुळे डॉ. मुरलीमनोहर जोशी यांच्या गळ्यात माळ पडली. तिसरे मंडळ अध्यक्षांविना...प्रतिष्ठित असे तिसरे मंडळ नेतृत्वहीन झाले आहे. योजना आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानंतर आयसीसीआर या तिसऱ्या मंडळाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला असून, या सर्वांचे कामकाज ठप्प पडले आहे.