शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गायक अदनान सामीला मिळणार भारतीय नागरिकत्व?

By admin | Updated: October 24, 2015 12:25 IST

गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहणारा व पाकिस्तानी नागरिकत्वाचा त्याग करणारा गायक अदनान सामी लवकरच भारतीय नागरिक बनण्याची शक्यता आहे

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २४ - गेल्या १५ वर्षांपासून भारतात राहणारा व पाकिस्तानी नागरिकत्वाचा त्याग करणारा गायक अदनान सामी लवकरच भारतीय नागरिक बनण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार अदनानला भारतीय नागरिकत्व बहाल करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. मात्र पाकिस्तानी कलाकार, खेळाडूंना तीव्र विरोध करत आंदोलन करणारी शिवसेना यावर काय भूमिका घेते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यातच अदनानला अनिश्चित कालावधीसाठी भारतात राहण्याची परवानगी दिली होती. २००१ साली एका वर्षाच्या व्हिसासह भारतात आलेल्या अदनाने वेळोवेळी व्हिसाचे नूतनीकरण केले होते. मात्र त्याच्या पासपोर्टची मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी अधिका-यांनी त्याच्या नूतनीकरणास नकार दिला. त्यानंतर अदनानने गेल्या मे महिन्यात गृहमंत्रालयातील अधिका-यांची भेट घेऊन आपल्याला पाकिस्तानमध्ये पाठवले जाऊ नये अशी मागणी केली. मानवतावादी भूमिकेतून त्याची ही मागणी मान्य झाली होती. कायद्यानुसार विज्ञान, तत्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता या क्षेत्रांमध्ये विशेष योगदान देणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची सोय आहे. त्यामुळे आता अदनान सामी लवकरच भारतीय नागरिक बनण्याची शक्यता आहे.