शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

'आदर्श ग्राम योजनेचा' मोदींच्या हस्ते शुभारंभ, मात्र शिवसेना खासदार अनुपस्थित

By admin | Updated: October 11, 2014 13:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी 'खासदार आदर्श ग्राम योजने'चा शनिवारी शुभारंभ केला, मात्र शिवसेनेचे खासदार या कार्यक्रमास अनुपस्थित होते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ' खासदार आदर्श ग्राम योजने'चा आज (शनिवार) शुभारंभ केला, मात्र या कार्यक्रमास शिवसेनेचा एकही खासदार उपस्थित नव्हता. शिवसेना-भाजपाची गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत असून सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसनेचे खासदार आदर्श ग्राम योजनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील का याबद्दल उत्सुकता होती, मात्र एकही खासदाराने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. 
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्गाटन झाले. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा आहे. ही योजना ३ टप्प्यांत राबवण्यात येईल. अल्प काळातील कामे तीन महिन्यांत पूर्ण करावी लागतील. तर मध्यम मुदत एक वर्ष व दीर्घ मुदत एका वर्षापेक्षा जास्त देण्यात आली आहे. त्या कालावधीत गावांची कामे पूर्ण करावी लागतील. खुद्द पंतप्रधानही त्यांच्या वारणासी मतदारसंघातील ककरिया गाव दत्तक घेऊन विकास करणार आहेत.
गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य आहे असे सांगत पंतप्रधानांनी या योजनेची आवश्यकता स्पष्ट केली. मात्र खासदारांना आपले स्वत:चे वा सासुरवाडीचे गाव दत्तक घता येणार नाह, असा टोलाही पंतप्रधानांनी यावेळी लगावला.