शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता आर्यन वेदने घातली पोलिसांशी हुज्जत आर्यन-पोलीस शिपायाविरोधात एनसी

By admin | Updated: June 2, 2015 00:03 IST

अभिनेता आर्यन वेदने घातली पोलिसांशी हुज्जत

अभिनेता आर्यन वेदने घातली पोलिसांशी हुज्जत
आर्यन-पोलीस शिपायाविरोधात एनसी

मुंबई । दि. १ (प्रतिनिधी)
............................................

मॉडेल, अभिनेता आर्यन वेद याने काल जुहू परिसरात वाहतूक पोलीस शिपायाशी हुज्जत घातली. दोघांमधील वाद ब्रेथॲनलायझर यंत्रावरून घडला. या प्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यावरून दोघांविरोधात एनसी नोंद करण्यात आली.
जुहूच्या १०व्या रस्त्यावर रात्री अकराच्या सुमारास नाकाबंदीत आर्यनची कार पोलिसांनी अडवली. तो दारूच्या नशेत कार चालवत असल्याचा संशय पोलीस शिपाई सतीश म्हात्रे यांना होता. म्हात्रे यांनी ब्रेथॲनलायझर यंत्र आर्यनसमोर धरले आणि त्यात श्वास सोडण्यास सांगितले. मात्र आर्यनने त्यास नकार दिला. आर्यनने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ते यंत्र वरकरणी अनेक दारूडया चालकांनी वापरलेले वाटत होते. ते वापरण्यास मला किळस वाटला. त्यामुळे मी नवे यंत्र आणा, अशी मागणी केली. मात्र पोलीस शिपायाने त्यावरून माझ्याशी हुज्जत घातली. मला शिवीगाळ केली. नंतर मी जुहू पोलीस ठाणे गाठले. तेथे नवे यंत्र मला देण्यात आले. मी दारू प्यायलो नव्हतो हे स्पष्ट झाले.
दरम्यान चाचणीनंतर आर्यनने म्हात्रेंविरोधात तक्रार दिली. तर म्हात्रे यांनीही सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार आर्यनविरोधात दिली. दोघांविरोधा एनसी दाखल करण्यात आल्याची माहिती वाहतूक दलाचे सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली. वाहतूक पोलिसांकडील ब्रेथॲनलायझर यंत्रे स्वच्छ आणि सुरक्षित आहेत. जर आर्यनला यंत्राबाबत संकोच होता तर त्याने तेथे उपस्थित वरिष्ठ अधिकार्‍यांना तसे सांगायला हवे होते. शिवाय जर तो दारू प्यायला नव्हता तर त्याने इतका गोंधळ घालण्याची काहीच आवश्यकता नव्हती, असेही भारंबे यांनी सांगितले.