शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

८५ वाहनांवर कारवाईचा बडगा वाहतूक शाखेची कारवाई : १२ हजार रुपयांची दंडवसुली

By admin | Updated: March 22, 2016 00:41 IST

जळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ८५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२ हजार रुपयांची दंडवसुली झाली. वाहतूक शाखेने अचानक कारवाई अस्त्र उगारल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली होती.

जळगाव : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ८५ वाहनांवर सोमवारी शहर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १२ हजार रुपयांची दंडवसुली झाली. वाहतूक शाखेने अचानक कारवाई अस्त्र उगारल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली होती.
शहरात विविध ठिकाणी असणार्‍या नो-पार्किंग झोनमध्ये थांबणार्‍या ऑटोरिक्षा, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणार्‍या मिनीडोअर, कागदपत्रे नसलेल्या ॲपेरिक्षा तसेच लायसन्स नसणार्‍या वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. सकाळी १० वाजेपासून या कारवाईला सुरुवात झाली होती. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. त्यात ८५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई झाली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांना वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. त्याठिकाणी दंडात्मक कारवाई केल्यानंतर ही वाहने सोडण्यात आली. प्रत्येक वाहनाला नियमानुसार १०० ते ३०० रुपये दंड आकरण्यात आला.
या ठिकाणी झाली कारवाई
शहरातील टॉवर चौक, अजिंठा चौफुली, इच्छादेवी चौफुली, आकाशवाणी चौफुली, पाचोरा रोड, बसस्थानक परिसर तसेच महामार्गावर ठिकठिकाणी ही कारवाई करण्यात आली. ओंकारेश्वर मंदिर परिसरात धूम स्टाइल दुचाकी चालवणार्‍यांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आल्याने या परिसरात वाहतूक शाखेने ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केली आहे. काही ठिकाणी फिक्स पॉइण्ट उभारून कर्मचार्‍यांची नेमणूक केल्याची माहिती वाहतूक शाखेकडून मिळाली.

---कोट
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ८५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून पुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. ही वाहने दंडात्मक कारवाईनंतर सोडण्यात आली.
-चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा