शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांवरही हातोडा नागरिकांचा विरोध : अतिक्रमण विभागातर्फे दोन पथकांद्वारे कारवाई

By admin | Updated: February 19, 2016 00:23 IST

सोबतफोटो-४५जळगाव : मनपा अतिक्रमण विभागातर्फे गुरूवारी संभाजीनगर स्टॉपजवळील घराच्या साईडमार्जीनमध्ये केलेले जिन्याचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र विरोधाला न जुमानता ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर सानेगुरूजी उद्यानामागील आऊटहाऊसचे अनधिकृत बांधकामही तोडण्यात आले. दरम्यान क्रेझी होमचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे कामही गुरूवारीही सुरूच होते.

सोबतफोटो-४५जळगाव : मनपा अतिक्रमण विभागातर्फे गुरूवारी संभाजीनगर स्टॉपजवळील घराच्या साईडमार्जीनमध्ये केलेले जिन्याचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेलेल्या पथकाला नागरिकांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र विरोधाला न जुमानता ते अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. त्यानंतर सानेगुरूजी उद्यानामागील आऊटहाऊसचे अनधिकृत बांधकामही तोडण्यात आले. दरम्यान क्रेझी होमचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे कामही गुरूवारीही सुरूच होते.
क्रेझीहोमवर दुसर्‍या दिवशीही कारवाई
महामार्गालगत असलेल्या क्रेझीहोमच्या अनधिकृत बांधकामावर बुधवारी कारवाईस सुरूवात करण्यात आली होती. कॉर्नरला बांधलेल्या संरक्षण भिंतीचे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात करण्यात आली होती. गुरूवारी ते बांधकाम तोडण्यात आले. तसेच स्टेजचे अनधिकृत बांधकाम, मार्जीन स्पेसमधील टॉयलेट, किचनचे शेड, पार्कीर्ंग स्पेसमधील डायनिंग हॉलचे बांधकाम तोडण्यात आले.
जिन्याचे बांधकाम तोडले
संभाजीनगर स्टॉपजवळील वत्सला गौतम सोनवणे यांच्या घराच्या मार्जीनस्पेसमध्ये अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट जिन्याबाबत शेजार्‍याने तक्रार केलेली होती. त्याची नगररचनाकडे सुनावणी होऊन सकारण आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार अतिक्रमण विभागाचे पथक तेथे कारवाईसाठी गुरूवारी दुपारी पोहोचले. मात्र रहिवाशांनी विरोध केला. विरोध मोडून काढत हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.
आऊटहाऊसचे बांधकामही तोडले
सानेगुरूजी उद्यानाच्या पाठीमागील एम.एम. कुलकर्णी यांच्या घराच्या मार्जीनस्पेसमध्ये असलेले आऊटहाऊसचे १५ बाय २० फुटांचे अनधिकृत बांधकामही मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडण्याची कारवाई केली. याबाबत २०१३ मध्येच सकारण आदेश देण्यात आलेले होते.
---- इन्फो---
सर्व सकारण आदेशांवर कार्यवाही
अनधिकृत बांधकाम अथवा अतिक्रमणाबाबतच्या तक्रारींवर नगररचना सहाय्यक संचालकांकडे झालेल्या तक्रारींवर सुनावणी घेऊन कारवाईसाठी दिलेले सकारण आदेश अतिक्रमण विभागाकडे कारवाईसाठी प्रलंबित आहेत. त्या सर्व आदेशांवर कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागाने गुरूवारी क्रेझीहोमसह आणखी दोन ठिकाणी कारवाई केली.