पान २ गावस यांच्याकडून अनेकांची लूट ताम्हणकर यांचा आरोप
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
गावस यांच्याकडून अनेकांची लूट
पान २ गावस यांच्याकडून अनेकांची लूट ताम्हणकर यांचा आरोप
गावस यांच्याकडून अनेकांची लूटताम्हणकर यांचा आरोपपणजी : वाहतूक खात्याचे सहाय्यक संचालक उदय गावस आणि सहाय्यक मोटार वाहतूक निरीक्षक एम.व्ही.उम्रसकर यांच्या समवेत खात्याचे संचालक अरुण देसाई व मंत्री सुदिन ढवळीकर यांचीही भ्रष्टाचारविरोधी पथकाने चौकशी करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. ताम्हणकर म्हणाले की, उदय गावस यांनी पहिल्यांदाच नव्हे, तर यापूर्वी कितीतरी वेळा विविध व्यक्तींकडून लाच घेतली आहे. गावस यांचे पद आणि नोकरीही खोटेपणाच्या दाखल्यावर आधारित असल्याचा आरोप ताम्हणकर यांनी केला. गावस यांनी नोकरीवर रुजू झाल्यानंतर ९ वर्षांनी डिप्लोमा घेतला. नोकरीत ओबीसी विभागातून नियुक्त झाले आणि प्रमोशन मात्र एसटी या विभागातून घेतले गेले. त्यांच्या या भानगडींबाबत खात्याने कधीही प्रश्न उपस्थित केले नाहीत किंवा चौकशीही केली नाही.गावस यांना २00१ मध्ये बढती आली होती. मात्र, आपल्या वृद्ध आईवडिलांचे निमित्त देऊन त्यांनी ती नाकारली. मात्र, एका वर्षानंतर वाहतूक खात्याचा उत्तर गोवा अंमलबजावणी विभाग या पदावर बढती द्यावी, अशी मागणी केली. गावस हे एक भ्रष्टाचारी सरकारी अधिकारी असल्याचा आरोपही ताम्हणकर यांनी केला.वाहतूक अधिकारी बहुतेकवेळा सरकारी गाड्यांचा वापर खासगी कामांसाठी करतात. यावर निर्बंध यावा म्हणून यापूर्वी तक्रार सादर केली आहे. त्यावर कोणीही कारवाई केली नाही. खासगी बसवाल्यांना लुटण्याचा प्रकारही आरटीओ अधिकार्यांत सुरू असतो. आरटीओ अधिकार्यांनी लाचखोरीची मर्यादा ओलांडू नये, असे ताम्हणकर म्हणाले. (प्रतिनिधी)