खून प्रकरणातील आरोपींना अटक संगमनेर : ५ दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
संगमनेर : अनैतिक संबंधातून मेंढवण गावात झालेल्या सोमनाथ बडे खूनप्रकरणी फरार झालेले आरोपी समीर चाँद पठाण व अकबर चाँद पठाण यांना पोलिसांनी सुपा(ता.पारनेर) येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
खून प्रकरणातील आरोपींना अटक संगमनेर : ५ दिवसांची पोलीस कोठडी
संगमनेर : अनैतिक संबंधातून मेंढवण गावात झालेल्या सोमनाथ बडे खूनप्रकरणी फरार झालेले आरोपी समीर चाँद पठाण व अकबर चाँद पठाण यांना पोलिसांनी सुपा(ता.पारनेर) येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत वृत्त असे, अनैतिक संबंधाच्या कारणावरून आरोपी समीर पठाण व अकबर पठाण यांनी सोमनाथ बडे यांचा धारधार चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी तालुका पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र खून करून फरार झालेल्या आरोपींना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. तालुका पोलीस निरीक्षक संजय भामरे यांनी तातडीने तपासचके्र फिरवत शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी समीर व अकबर पठाण यांना सुपा(ता.पारनेर) येथून अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)