शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुती झालेल्या महिलेचा मृत्यू डॉक्टरांवर आरोप : धुळे येथे इनकॅमेरा शवविच्छेदन

By admin | Updated: February 12, 2016 22:45 IST

जळगाव: नॉर्मल प्रसूती झालेल्या सेहबाजबी रहिमखान (वय २२ रा.शाहू नगर) या विवाहितेचा शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान, या मागणीमुळे पोलिसांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह धुळे येथे रवाना केला.

जळगाव: नॉर्मल प्रसूती झालेल्या सेहबाजबी रहिमखान (वय २२ रा.शाहू नगर) या विवाहितेचा शुक्रवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जीपणा केल्यामुळे महिलेला जीव गमवावा लागला, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान, या मागणीमुळे पोलिसांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह धुळे येथे रवाना केला.
सेहबाज यांना प्रसूतीसाठी शाहू नगरातील डॉ.नंदा जैन यांच्या तारा हॉस्पिटलमध्ये ९ फेब्रुवारी रोजी दाखल केले होते. त्या दिवशी नॉर्मल प्रसूती होऊन त्यांनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर दोन दिवसांनी सेहबाज यांची प्रकृती खालावली. त्यामुळे गुरुवारी रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी त्यांना ओम क्रिटीकल या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना दोन वाजून ३८ मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला.
हलगर्जीपणाचा आरोप
सेहबाज यांच्या मृत्यूला डॉक्टरांचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप यांनी केला. त्यांना रक्ताची गरज भासल्यानंतर दोन बाटल्या रक्त लावण्यात आले. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी अधिकच बिघाड झाला. त्यामुळे डॉ.नंदा जैन यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी ओम क्रिटीकल व जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नवलनाथ तांबे व सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी रात्री नातेवाईकांची समजूत काढली, परंतु कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
मृतदेह धुळे येथे रवाना
मृत्यू झाल्यानंतर सेहबाज यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. नातेवाईकांच्या मागणीनुसार मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी मृतदेह धुळे येथे पाठविण्यात आला आहे. तेथे इनकॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यावर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे निरीक्षक तांबे यांनी सांगितले.