शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत अपघाती मृत्यू अधिक

By admin | Updated: July 19, 2016 05:55 IST

देशात जवळपास पाच लाख रस्ते अपघातांत एक लाख ४६ हजार लोकांना प्राण गमवावे लागले.

मनवर सिंह,

नवी दिल्ली- देशात जवळपास पाच लाख रस्ते अपघातांत एक लाख ४६ हजार लोकांना प्राण गमवावे लागले. रस्ते अपघातातील बळींची संख्या तामिळनाडू व महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. रस्ते अपघातांतील बळींची संख्या २०१३ मध्ये १ लाख ३७ हजार ५७२ होती, ती २०१४ मध्ये १ लाख ३९ हजार ६७१ तर २०१५ मध्ये आणखी वाढून १ लाख ४६ हजार १३३ झाली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, ‘इंटरनॅशनल रोड फेडरेशन, जिनेव्हाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, जागतिक रस्ता आकडेवारी २०१५ (डब्ल्यूआरएस) नुसार २०१३ या वर्षी रस्ते अपघातांत सर्वाधिक मृत्यू भारतात (१३७५७२) झाले. यानंतर, अमेरिका (३२७१९) आणि रशिया (२७०२५) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर होते. रस्ते अपघातांना व त्यातील बळींच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गांना सर्व्हिस रोडची तरतूद, जंक्शनमध्ये सुधारणा, दादरा, भूमिगत रस्त्याची तरतूद यासह अभियांत्रिकी उपायांद्वारे अपघाती ठिकाणांची स्थिती सुधारण्यात येणार आहे,’ असेही ते म्हणाले.