वळदगावच्या उपसरपंचाचा अपघाती मृत्यू
By admin | Updated: May 11, 2014 00:04 IST
वळदगावच्या उपसरपंचाचा अपघाती मृत्यू
वळदगावच्या उपसरपंचाचा अपघाती मृत्यू
वळदगावच्या उपसरपंचाचा अपघाती मृत्यूवाळूज महानगर : पंढरपूरहून वळदगावकडे जाताना खाम नदीत पडून जखमी झालेले वळदगावचे उपसरपंच राजेंद्र त्र्यंबकराव झळके (४५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले.याबाबतची माहिती अशी की, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झळके हे पंढरपूरहून वळदगावकडे मोटारसायकलवरून निघाले होते. रस्त्यावर असणार्या पुलाजवळ आले असताना ते मोटारसायकलसह खाम नदीत कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बीड बायपासवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने वळदगावच्या नागरिकांना धक्काच बसला. परिसरात त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. उद्या (रविवारी) सकाळी १० वाजता वळदगावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.