पांढरीपूल परिसरात अपघात
By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST
अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपूलजवळ सोमवारी रात्री तीन कंटेनर आणि एक जीप एकमेकांवर आदळले. या विचित्र अपघातात जीपमधील दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पांढरीपूल परिसरात अपघात
अहमदनगर : नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपूलजवळ सोमवारी रात्री तीन कंटेनर आणि एक जीप एकमेकांवर आदळले. या विचित्र अपघातात जीपमधील दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सोमवारी मध्यरात्री दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. त्याचवेळी औरंगाबादकडून नगरकडे येणारा कंटेनरही या दोन कंटेनरवर धडकला. या कंटेनरला औरंगाबादकडून येणारी एक मालवाहू जीप धडकली. वाहनाचा वेग नियंत्रित करता न आल्याने जीपचे नुकसान झाले. यामध्ये गोपाळ सखाराम खरमाटे आणि भीमराव दादाजी गायकवाड (रा. नेवासा) हे जखमी झाले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी दोघा जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतुकीतील अडथळा दूर करण्यासाठी पोलीस, ग्रामस्थांनी प्रयत्न केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.