शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

पेट्रोल पंपांवर कार्ड पेमेंट विनाशुल्क स्वीकारणार

By admin | Updated: January 10, 2017 04:22 IST

पेट्रोल पंपांवर डेबिट आणि के्रडिट कार्ड १३ जानेवारीनंतरही स्वीकारली जातील व त्यासाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही

नवी दिल्ली : पेट्रोल पंपांवर डेबिट आणि के्रडिट कार्ड १३ जानेवारीनंतरही स्वीकारली जातील व त्यासाठी ग्राहकाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, असा खुलासा सोमवारी केंद्र सरकारने येथे केला. डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापराचा खर्च कोणी सोसायचा हा प्रश्न बँका आणि तेल कंपन्यांत चर्चेत आहे. तेल कंपन्यांनी ही कार्डे आम्ही स्वीकारणार नाहीत, असे रविवारी स्पष्ट केल्यानंतर देशातील लक्षावधी ग्राहकांची गैरसोय होणार होती. ते संकट टाळण्यासाठी दुसऱ्याच दिवशी सरकारने हा खुलासा केला. मर्चंट डिस्काउंट रेटचे (एमडीआर) शुल्क रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनानुसार आकारले जाईल. परंतु ते सोसायचे कोणी यावर बँका आणि तेल विपणन कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे, असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वार्ताहरांना सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी प्रधान यांची याच मुद्यावर चर्चा झाली. पेट्रोलची किरकोळ विक्री करणारे, पेट्रोलपंपांचे मालक हे कमिशन एजंट म्हणून काम करीत असून आम्ही हा खर्च त्यांच्यावर टाकणार नाही, असे आश्वासन रविवारी आम्ही दिले होते, असे प्रधान म्हणाले. कार्ड वापरण्याचे एक टक्का शुल्क पेट्रोल पंप चालकांना द्यावे लागेल, असे बँकांनी त्यांना सांगितल्यावर पंप चालकांनी आम्ही कार्डने पैसे स्वीकारणार नाही, अशी धमकीच दिली होती. ट्रॅन्झॅक्शन चार्जेस (व्यवहार शुल्क) आणखी पाच दिवस आम्ही आकारणार नाही, असे बँकांनी मान्य केल्यावर हा पेच तात्पुरता सुटला. पंपचालकांनी १३ जानेवारीपर्यंत इशारा अमलात आणणार नसल्याचे सांगितले. जे ग्राहक रोखविरहीत व्यवहार डिजिटल माध्यमातून करतील त्यांना व्यवहारासाठी खर्च सोसावा लागणार नाही हे आश्वासन मागे घेतले जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.