शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! वकिलाकडे सापडलं 125 कोटींचं घबाड

By admin | Updated: October 20, 2016 11:09 IST

दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणा-या वकिलाकडे आढळलेली संपत्ती पाहून आयकर विभागाचे अधिकारीदेखील चक्रावले आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणा-या वकिलाकडे आढळलेली संपत्ती पाहून आयकर विभागाचे अधिकारीदेखील चक्रावले आहेत. वकिलाच्या दक्षिण दिल्लीमधील निवासस्थानी मारण्यात आलेल्या छाप्यात तब्बल 125 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. 
 
दिल्लीमध्ये 100 कोटींचा बंगला विकत घेतल्यानंतर हे महाशय चर्चेत आले होते. छाप्यादरम्यान अनेक ठिकाणच्या संपत्तीचे आणि गुंतवणुकीची कागदपत्र हाती लागल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिका-यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वकिल एक प्रतिष्ठीत व्यक्ती असून वकिली क्षेत्रात त्यांची चांगली पकड आहे. 
 
आयकर विभागाने सध्या अभियान सुरु केलं असून नागरी उड्डाण, पायाभूत सुविधा आणि संरक्षण क्षेत्रात काम करणा-यांविरोधात कारवाई केली जात आहे. गेल्या काही दिवसांत या क्षेत्रांशी संबंधिक अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. 
 
(६५ हजार कोटींचे काळे धन घोषित, अर्थमंत्री अरुण जेटलींची माहिती)
 
संपत्तीची घोषणा करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेली मदुत 30 सप्टेंबर रोजी संपली असताना ही कारवाई केली जात आहे. आयकर चोरी रोखण्यासाठी सरकारकडून हे महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं होतं. ज्यांनी आपल्या संपत्तीची घोषणा केलेली नाही त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून छापेमारी केली जाणार आहे.
 
उत्पन्न प्रकटीकरण योजने अंतर्गत एकूण 64,275 करदात्यांनी 65,250 कोटींच्या काळ्या पैशाची माहिती असल्याचं  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं होतं. आयकर चोरी रोखण्यासाठी सरकारकडून महत्वाची पावलं उचलण्यात आलं होतं. 1 जूनला सरकारकडून  उत्पन्न प्रकटीकरण योजना सुरु करण्यात आली होती ज्याची मुदत 30 सप्टेंबर 2016 च्या मध्यरात्री संपली.