अभिजित कोळपे बातमी : एकोणीस वर्षे विनाअपघात दिली सेवा
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
कौतुकाचा वर्षाव : संजय काकडे यांचा पीएमपीएल मंडळाकडून गौरव
अभिजित कोळपे बातमी : एकोणीस वर्षे विनाअपघात दिली सेवा
कौतुकाचा वर्षाव : संजय काकडे यांचा पीएमपीएल मंडळाकडून गौरवसासवड : पीएमपीएलमध्ये कार्यरत असणारे चालक संजय साहेबराव काकडे यांनी १९ वर्षे विनाअपघात सेवा दिली. याबद्दल पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. पुणे शहर व आसपासच्या उपनगरातील रस्त्यावर वाहतुकीच्या प्रचंड अडचणी गंभीर स्वरूपात असताना कौशल्य, कामाची एकाग्रता व मनावर संयम ठेवून सेवा केल्याबद्दल गौरव करण्यात येत असल्याचे नमूद केले. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक प्रवीण अष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरा शिंदेकर, जनसंपर्क अधिकारी दीपकसिंह परदेशी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.काकडे हे सासवडचे रहिवासी असून, त्यांच्या गौरवाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.फोटो ओळी : संजय साहेबराव काकडे यांना सन्मानपत्र देताना डॉ. श्रीकर परदेशी.