शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

अभिजित कोळपे बातमी : पाटस-बारामती मार्गाची शीघ्रगतीने खड्डे दुरुस्ती

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

पंतप्रधान दौर्‍याची पार्श्वभूमी : रस्ता चकाचक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान

पंतप्रधान दौर्‍याची पार्श्वभूमी : रस्ता चकाचक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान
वासुंदे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेला पाटस-बारामती रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने शीघ्रगतीने खड्डे भरून काढल्याने काहीअंशी तो चकाचक झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पाटस-बारामती रस्त्याचा प्रश्न ग्रामस्थांनी वेळोवेळी मांडूनदेखील पूर्ण होत नव्हता. तो मोदी यांच्या एका दौर्‍यात काही प्रमाणात मार्गी लागल्याने मोदी वर्षातून एकदा तरी बारामती दौर्‍यावर यावेत, अशी चर्चा गावपातळीवरील चव्हाट्यावर सुरू असून, याबाबत ग्रामस्थांत चर्चेचा विषय बनला आहे.
या मार्गावरील बारामती फाटा ते वासुंदेपर्यंतच्या मार्गावर लहान मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची पूर्ण चाळणच झालेली होती. त्यामुळे हा रस्ता प्रवासासाठी अगदीच खडतर झाला होता. यातच या मार्गाच्या डांबरीकरणाच्या कामास सुरुवात होऊनही अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नसल्याने नव्याने डांबरीकरण झालेला भाग सोडला, तर उर्वरित रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले होते. या मार्गावरून धावणार्‍या वाहनांचे पार्ट तर निखळत होते. परंतु प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
मात्र, गेली अनेक दिवस सर्वसामान्य जनतेच्या प्रवासास खडतर झालेल्या या मार्गाची मोदी यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने बारामतीला जाणार्‍या शासकीय अधिकारी, पदाधिकारी व खास मान्यवरांच्या सोईसाठी संबंधित विभागाने अत्यंत कमी वेळात या मार्गावरील खड्डे बुजवून आपली मोहीम फत्ते केली.

चौकट
सुसाट गाड्यांचा धुरळा
शनिवार (दि.१४) रोजी अगदी सकाळपासूनच या मार्गावरून लाल व निळ्या अंबर दिव्यांच्या गाड्यांबरोबरच इतर आलिशान गाड्या सुसाट वेगाने धावत होत्या. मात्र, या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणार्‍या प्रवाशांबरोबरच सर्वसामान्य जनतेला सुसाट धावणार्‍या गाड्यांचा धुरळा पाहायला मिळाला.
फोटो ओळ : पाटस-वासुंदे-बारामती या मार्गावरील पंतप्रधान दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर केलेली खड्डे दुरुस्ती.
(छायाचित्र : गोरख जांबले)
14022014-िं४ल्लि-14
14022014-िं४ल्लि-15