बचत गट चालविणार्या संस्था अधीक्षिकेचे अपहरण? पाच जणांनी अपहरण केल्याचा आरोप : तीन दिवसानंतर आढळल्या जखमी अवस्थेत
By admin | Updated: March 4, 2016 22:37 IST
जळगाव: बचत गटाच्या महिलांच्या रकमेवरून आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या येथील बहिणाबाई सातपुडा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अधीक्षिका सविता भालेराव यांचे मंगळवारी पाच तरुण व दोन महिलांनी अपहरण करून तीन दिवस पारोळ्याच्या जंगलात डांबून ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खुद्द भालेराव यांनीच हा प्रकार पत्रकार व पोलिसांना सांगितला.
बचत गट चालविणार्या संस्था अधीक्षिकेचे अपहरण? पाच जणांनी अपहरण केल्याचा आरोप : तीन दिवसानंतर आढळल्या जखमी अवस्थेत
जळगाव: बचत गटाच्या महिलांच्या रकमेवरून आरोप-प्रत्यारोपामुळे चर्चेत आलेल्या येथील बहिणाबाई सातपुडा आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अधीक्षिका सविता भालेराव यांचे मंगळवारी पाच तरुण व दोन महिलांनी अपहरण करून तीन दिवस पारोळ्याच्या जंगलात डांबून ठेवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खुद्द भालेराव यांनीच हा प्रकार पत्रकार व पोलिसांना सांगितला. भालेराव यांच्या म्हणण्यानुसार त्या मंगळवारी दुपारी त्यांच्या नाटेकर नावाच्या महिला सहकार्यांना घेऊन कारने काव्यरत्नावली चौकातील एका बॅँकेत संस्थेचे पैसे भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी हे पाच तरुण आपला पाठलाग करीत असल्याचा संशय त्यांना आला. बॅँकेत गेल्यानंतर कारमध्ये शिक्का विसरल्याने त्यांनी नाटेकर यांना तो शिक्का घेण्यासाठी पाठविले. त्या येण्याच्या आत भालेराव तोंडाला स्कार्फ बांधून बॅँकेतून बाहेर पडल्या. एका रिक्षाला हात दिला. तेव्हा त्याच रिक्षातून आलेल्या तरुणांनी ओढून तोंडाला पी बांधली. नंतर बेशुध्द केले. शुध्दीवर आल्या तेव्हा त्या पारोळ्याच्या जंगलात होत्या.दोन दिवस तेथे त्यांनी बेदम मारहाण केली. गुरुवारी पहाटे कारमधून मुंबईला घेऊन जाण्याच्या तयारीत असताना एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना खाली शुध्द आली. तेथे आरडाओरड केली असता त्यांनी डोक्यात रॉड टाकून चालत्या कारमधून फेकून दिले व तेथून पळ काढला.पारोळ्यात घेतली मदतपहाटे पाच वाजेच्या दरम्यान पारोळ्यातील लक्ष्मणदादा कॉलनीत भेटलेले कल्पना खैरनार व राहुल खैरनार यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.सरला पाटील यांच्यावर आरोपरामेश्वर कॉलनीतील सरला मनोज पाटील व संस्था अध्यक्ष सलीम पिंजारी, सविता भालेराव यांच्यात बचत गटाच्या महिलांकडून घेण्यात आलेल्या पैशांच्याबाबतीत वाद आहेत. जिल्हा पेठ व शहर पोलीस स्टेशनला तक्रारीही झाल्या होत्या. यातून भालेराव यांना संस्थेच्या कार्यालयात एकदा मारहाणही झाली होती. अपहरणकर्त्या तरुणांना आपण सरला पाटील यांच्यासोबत बर्याच वेळा पाहिले आहे,त्यामुळे त्यांनीच हा कट रचला आहे, असा आरोप सविता भालेराव यांनी केला. रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले, गुन्हे शोध पथकाचे प्रदीप चौधरी व शरद पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन भालेराव यांचा जबाब नोंदविला आहे.