कोकणीतून आरती लेखन स्पर्धा
By admin | Updated: September 8, 2015 02:08 IST
पणजी : कोकणी भाषेतून गणपतीच्या आरती सादर करण्यासाठी उपलब्ध व्हाव्यात म्हणून कोकणी लेखक संघातर्फे दरवर्षी कोकणी आरती लेखन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदाही कोकणीतून आरती स्पर्धा जाहीर केली आहे. लयबद्ध ताल-सुरात गाण्यासारख्या कोकणी आरतीच्या रचना असाव्यात. सध्या वापरात असलेल्या आरतीचे अनुकरण न करता आगळ्या पद्धतीने आरतीचे लेखन असावे. विजेत्यांना प्रथम रु. 700, दुसरे रु. 500 व तिसरे रु. 300 रोख बक्षिसे देण्यात येतील. आरती देवनागरीत स्वच्छ अक्षरात लिहिलेल्या किंवा टाईपसेट केलेल्या असाव्यात. आरती 10 सप्टेंबरपर्यंत, सचिव, कोकणी लेखक संघ, द्वारा रुद्रा प्रकाशन, सुफला गायतोंडे, काकुलो कॉलनी, मिरामार या पत्त्यावर पाठवाव्यात.