शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी पंजाबमध्ये ‘आप’ची जोरदार मुसंडी

By admin | Updated: February 7, 2016 01:46 IST

अरविंद केजरीवालांच्या मुख्तसर येथील माघी रॅलीने पंजाबच्या राजकारणात नवे रंग भरले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला १0 ते ११ महिने शिल्लक असले तरी ४ वर्षांपूर्वी स्थापन

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीअरविंद केजरीवालांच्या मुख्तसर येथील माघी रॅलीने पंजाबच्या राजकारणात नवे रंग भरले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला १0 ते ११ महिने शिल्लक असले तरी ४ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘आप’ने आतापासूनच पंजाबचा गड जिंकण्यासाठी मुसंडी मारली आहे. सत्ताधारी अकाली दल, भाजप आणि प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेतील काँग्रेसला ‘आप’ने आक्रमक आव्हान दिले आहे.दोन मास्टर स्ट्रॅटेजिस्टच्या कौशल्याचा कस या निवडणुकीत पणाला लागणार आहे. अकाली दलाच्या दहा वर्षांच्या सत्तेविरोधातील वातावरणाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेसच्या कॅप्टन अमरिंदरसिंगांनी निवडणूक रणनीतीची सूत्रे नीतीशकुमार आणि त्यापूर्वी नरेंद्र मोदींच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर यांच्या हाती सोपवली आहेत. ‘आप’ची रणनीती दुर्गेश पाठक ठरवीत आहेत. दुर्गेश पाठक अलाहाबादचे आहेत. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत २0१४ साली केजरीवालांनी १0 मतदारसंघांची जबाबदारी पाठकांकडे सोपवली होती, त्यापैकी ७ जागा ‘आप’ने जिंकल्या. त्यानंतर २0१५ साली दिल्लीच्या ३५ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असलेल्या पाठक यांनी ३४ जागांवर विजय मिळवून दाखवला. वाराणसी मतदारसंघात केजरीवालांच्या लोकसभा निवडणुकीची सूत्रेही त्यांच्याकडेच होती.महत्त्वाकांक्षा वाढलीपंजाबच्या ७0 लाख कुटुंबांसह ‘आप’ च्या हितचिंतकांना ‘आप’ला शक्य तितकीच मदत करा, पक्षाचे सदस्य होण्याची बळजबरी नाही, उमेदवारांना मदतनिधी म्हणून १ रुपया, ५ किंवा १0 रुपये दिलेत तरी स्वीकारले जातील, असे आवाहन केले आहे. लोकसभा निवडणुकीत ४ खासदार निवडून आल्याने सत्तेवर येण्याची महत्त्वाकांक्षा ‘आप’ने बाळगली आहे.