शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आप’चा पाठिंबा कोणत्याच आघाडीला नाही - केजरीवाल

By admin | Updated: May 12, 2014 04:47 IST

वेळ आल्यास तिसर्‍या आघाडीलाही पाठिंबा देण्याची तयारी आम आदमी पार्टीने (आप) दर्शविल्याच्या बातम्या खोडसाळ असल्याचे स्पष्टीकरण अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे.

 

वाराणशी : भारतीय जनता पार्टीला (भाजपा) सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी वेळ आल्यास तिसर्‍या आघाडीलाही पाठिंबा देण्याची तयारी आम आदमी पार्टीने (आप) दर्शविल्याच्या बातम्या खोडसाळ असल्याचे स्पष्टीकरण अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याचे मतदान उद्या सोमवारी संपत असतानाच, आपचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिसर्‍या आघाडीला सरकार स्थापनेसाठी आमच्या पाठिंब्याची गरज भासलीच तर मुद्यांच्या आधारावर आम्ही पाठिंबा देऊ शकतो़ तथापि, निवडणूक निकालांचे विश्लेषण केल्यानंतरच पक्ष आपली भूमिका ठरवेल, असे सांगितले होते. आमचे आंदोलन आम आदमीसाठी आहे़ त्यामुळे निश्चितपणे मुद्यांवर आधारित पाठिंबा देण्याचा विचार आम्ही करू शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़ राय यांच्या या वक्तव्यानंतर आप तिसर्‍या आघाडीला समर्थन देणार हा अन्वयार्थ वेगाने बातम्यांमधून पसरला. त्यावर कोणत्याही आघाडीला पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद््भवत नसल्याचे स्पष्टीकरण केजरीवाल यांनी दिले. आपने ४२२ जागांवर आपले उमेदवार उतरविले आहेत़ आपला पक्ष कमीतकमी १०० जागा जिंकेल, असा विश्वास केजरीवाल यांनी बोलून दाखवला आहे़ जागांबाबत राय यांना विचारले असता ते म्हणाले, किती जागा जिंकू, हा आमच्यासाठी गौण मुद्दा आहे़ निकाल कसाही येवो, आमचा संघर्ष सुरू राहणाऱ प्रामाणिक राजकारण्यांचा आवाज संसदेत पोहोचावा, हा आमचा हेतू आहे़

केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस  

निवडणूक आयोगाने रविवारी आम आदमी पक्ष नेते अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.काँग्रेस आणि भाजपाला दिलेले प्रत्येक मत ‘प्रभू आणि राष्ट्र’च्या विरुद्ध अविश्वास असेल, असे कथित विधान केजरीवाल यांनी अमेठीत केले होते. त्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. केजरीवाल यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. १३ मे पर्यंत त्यांना बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. केजरीवालांकडून मुदतीत उत्तर न मिळाल्यास आयोग आपल्या पद्धतीने निर्णय घेईल.