शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
2
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
3
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
4
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
5
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
6
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
7
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
8
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
9
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
10
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
11
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
12
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
13
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
14
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
15
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
16
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
17
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
18
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
19
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!

२९ हजार हेक्टरवर जलयुक्त शिवारची कामे ९६ कोटींचा खर्च : कृषी व वनविभागाची आघाडी ; ५०८ कामे प्रगतीपथावर

By admin | Updated: June 12, 2016 22:35 IST

जळगाव : जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला मार्च महिन्यानंतर आलेल्या वेगामुळे जिल्हाभरात विविध विभागामार्फत २९ हजार ५४६ हेक्टर वरील कामे पूर्ण झाली आहेत. कृषी व वनविभागांनी कामांमध्ये आघाडी घेतली असून या योजनेवर आतापर्यंत ९६ कोटी ६३ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

जळगाव : जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला मार्च महिन्यानंतर आलेल्या वेगामुळे जिल्हाभरात विविध विभागामार्फत २९ हजार ५४६ हेक्टर वरील कामे पूर्ण झाली आहेत. कृषी व वनविभागांनी कामांमध्ये आघाडी घेतली असून या योजनेवर आतापर्यंत ९६ कोटी ६३ लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
कंपार्टमेंट बंडींगची ३८३ कामे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभरात ३० हजार २०५ हेक्टरवरील ५ हजार २०७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यापैकी २५ हजार ९ हेक्टरवरील ३ हजार ९३२ कामे पूर्ण झाली आहेत. त्यात कंपार्टमेंट बंडींगचे ३८३, शेततळ्याचे ८७, मातीनाला बांधचे १०, सिमेंट नाला बांध दुरुस्तीचे ६१, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर (ठिबक) दोन हजार ३५५, नालाखोलीकरणाचे ९२८, सीसीटीचे ५ तर नवीन सीएनबीचे १०२ कामे पूर्ण झाली आहेत.
लघुसिंचन व जलसंधारण विभागाची धिमिगती
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या ३३२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यापैकी केवळ १६८ कामे पूर्ण झाली आहे. त्यात ५१ नवीन साठवण बंधारे,५२ साठवण बंधार्‍यांची दुरुस्ती, २७ पाझर तलाव दुरुस्तीचे, ११ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे दुरुस्ती, गाळ काढण्याचे ४ कामे, नवीन सीएनबीची २३ कामे झाली आहेत. ३२३ कामांपैकी अजून १५८ कामे अपूर्ण आहेत. येत्या २० दिवसात ही कामे पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागासमोर आहे. जलसंधारण विभागाच्या १३० कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र या विभागाकडून आतापर्यंत ९१ कामे पूर्ण झाले आहेत. १४ कामे जून महिन्यापर्यंत पुर्ण करायचे आहे.
विहिर पुनर्भरणचे कामे वेगात
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे पाझर तलावातील गाळ काढणे व विहिर तसेच बोअरवेलच्या पुर्नभरणाच्या १३४४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. या विभागाने आतापर्यंत तब्बल १३४२ कामे पूर्ण केली आहेत. शिल्लक राहिलेली दोन कामे काही दिवसात पूर्ण होणार आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाची ३४८ कामे पूर्ण झाली आहेत. १४७ कामे प्रगतीपथावर आहेत. यात हायड्रो फ्रॅक्टरींगचे १००, रिचार्ज शाफ्ट ॲण्ड रिचार्ज ट्रेंजची २०४, ॲक्विफर रिचार्ज शाफ्टची ४४ कामे पूर्ण झाली आहेत. रिचार्ज शाफ्टची १४७ कामे या विभागामार्फत सुरु आहेत.