शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

घर वाचवण्यासाठी ८०० जणांनी स्वीकारला इस्लाम धर्म

By admin | Updated: April 15, 2015 10:19 IST

रस्ता रुंदीकरणात तोडले जाणारे घर वाचवण्यासाठी उत्तरप्रदेशमधील रामपूर येथे वाल्मिकी समाजाच्या ८०० जणांनी मंगळवारी इस्लाम धर्म स्वीकारला आहे.

ऑनलाइन लोकमत 
रामपूर (उत्तरप्रदेश), दि. १५ - रस्ता रुंदीकरणात तोडले जाणारे घर वाचवण्यासाठी उत्तरप्रदेशमधील रामपूर येथे वाल्मिकी समाजाच्या ८०० जणांनी मंगळवारी इस्लाम धर्म स्वीकारला आहे. मुस्लीम धर्म स्वीकारला तर कोणीही तुमच्या घरांना हात लावणार नाही असे सरकारी अधिका-यांनी सांगितल्याने आम्ही नाईलाजास्तव इस्लाम धर्म स्वीकारला असे या धर्मांतर करणा-या नागरिकांचे म्हणणे आहे. 
रामपूरमधील तोफखाना परिसरात शॉपिंग मॉल बांधले जात असून या मॉलकडे जाण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचे कामही हाती घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेने रस्ता रुंदीकरणात बाधा आणणा-या घरांची यादी तयार करत ही घरं पाडली जातील असे जाहीर केले. या विभागातील बहुसंख्य लोकं ही वाल्मिकी समाजातील आहेत. हातोडा पडणा-या घरांवर लाल रंगाची निशाणीही लावण्यात आली आहे. घर पाडण्याची नोटीस बजावणा-या नगरपरिषदेच्या अधिका-याने इस्लाम धर्म स्वीकारल्यास तुमची घरं वाचतील असे सांगतले होते असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.  गेल्या चार दिवसांपासून स्थानिक रहिवासी उपोषण करत होते. मात्र नगरपरिषद व जिल्हाधिका-यांनी याची दखल न घेतल्याने या सर्वांनी १४ एप्रिलरोजी इस्लाम धर्म स्वीकारला.  मात्र यासाठी शहरातील एकाही मौलानाने परिसरात येण्यासाठी नकार दिला. पोलिसांनी परिसराला वेढा घातल्याने मौलाना आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही असे अमर या स्थानिकाने सांगितले. तर आमीष किवा लालसेपोट इस्लाम धर्म स्वीकारणे पाप असल्याने आम्ही तिथे गेले नाही असे एका मौलानाने सांगितले.