शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सराफा संपामुळे ७५ हजार कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2016 03:39 IST

दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याच्या विरोधात गेल्या २९ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यावसायिकांच्या संपामुळे देशभरात किमान ७५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले

मुंबई : दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याच्या विरोधात गेल्या २९ दिवसांपासून सुरू असलेल्या सराफा व्यावसायिकांच्या संपामुळे देशभरात किमान ७५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा ‘द जेम अ‍ॅण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिल’ने (जीजेईपीसी) केला आहे.अर्थसंकल्पात अबकारी कर लागू करण्याची घोषणा झाल्यानंतर त्याच दिवसापासून सुरू झालेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय वित्त मंत्रालयाचे माजी वित्तीय सल्लागार अशोक लाहिरी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे. तसेच, या समितीला ६० दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र तरीही व्यापारी संपावर ठाम आहेत. या प्रकरणी तोडगा काढावा म्हणून व्यापारी संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले असून येत्या ५ अथवा ६ एप्रिल रोजी पंतप्रधानांसोबत बैठक होण्याचे वृत्त असून या बैठकीत तोडगा निघेल, अशी आशा ज्वेलरी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. व्यापाऱ्यांच्या मते अबकारी कर सराफा उद्योगासाठी अडचणीचा ठरणार आहे. या क्षेत्रात १ कोटी कारागीर आहेत. (प्रतिनिधी)भाजपाने फसवणूक केल्याची भावनानव्या करानंतर त्यातील बहुतांश लोक बेकार होतील, असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने अबकारी कराच्या मुद्द्यावर फसवणूक केली असल्याची भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात अशाच पद्धतीने सराफा व्यावसायिकांवर अबकारी कर लागू करण्याची घोषणा झाली होती. नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी या निर्णयाला जाहीर विरोध करताना तत्कालीन काँगे्रस सरकारवर जोरदार टीका केली होती. मागील वेळी व्यापाऱ्यांनी २५ दिवस बंद पाळला होता. त्यानंतर कॉँग्रेस सरकारने हा कर मागे घेतला होता. मात्र, आता मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हाच कर लागू केल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.