शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

महिला बचत गटाचे ६६ हजार हडपले !

By admin | Updated: May 16, 2014 00:18 IST

शिवसेना वसाहतमधील एका महिला बचत गटाची मंजूर झालेल्या कर्जाची सुमारे ६६ हजार रुपयांची रक्कम हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.

अकोला - जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील एका महिला बचत गटाची मंजूर झालेल्या कर्जाची सुमारे ६६ हजार रुपयांची रक्कम हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. एस.के. मायक्रो फायनान्स शाखाध्यक्षाने हा प्रताप केला असून, त्याच्याविरुद्ध जुने शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना वसाहतमधील म्हसोबा लाईनमध्ये रहिवासी असलेली सविता भिकाजी वारकर यांनी परिसरातील सहा महिलांना सोबत घेऊन बचत गटाची निर्मिती केली. त्यानंतर बचत गटाच्या सहाही महिलांनी हैदराबाद येथील एस. के. मायक्रो फायनान्सच्या डाबकी रोड शाखेत कर्ज मिळण्याकरिता अर्ज सादर केला. एस के. मायक्रो फायनान्सचे शाखा अध्यक्ष जितेंद्र मधुकर उतखडे यांनी दस्तऐवजाची पाहणी केली. तसेच बचत गटाच्या सहाही महिलांची कोर्‍या कागदावर स्वाक्षरी घेतली; मात्र कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नाही. दोन ते तीन दिवसांमध्ये ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार असल्याचेही जितेंद्र उतखडे यांनी बचत गटाच्या महिलांना सांगितले. कर्ज मिळाले की नाही, याबाबत वरिष्ठ स्तरावरून फोनवर विचारणा झाल्यास कर्ज मिळाल्याचे सांगावे, असेही उतखडे यांनी महिलांना सांगून ठेवले होते. वरिष्ठ स्तरावरून विचारणा होताच, या महिलांनी कर्जाची रक्कम मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर महिलांनी कर्जाची रक्कम मागण्यासाठी एस के. मायक्रो फायनान्सच्या ऑफीसमध्ये वारंवार चकरा मारल्यानंतरही त्यांना कर्ज मिळाले नाही. यावरून त्यांना कर्ज नामंजूर झाल्याची माहिती मिळाली. मात्र, काही दिवसातच सहाही महिलांना कर्जाची मासिक रक्कम भरण्यात येत नसल्याची नोटीस आली. त्यानंतर महिलांनी फायनान्सच्या कार्यालयामध्ये जाऊन विचारणा केली असता त्यांनी ६६ हजार रुपये कर्जाची उचल केल्याचे समोर आले. मात्र, त्यांच्या कर्जाची रक्कम शाखा अध्यक्ष जितेंद्र उतखडे यांनीच हडप केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणामध्ये उतखडे यांनी सहाही महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी सविता वारकर यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एस. के. मायक्रो फायनान्सचा शाखा अध्यक्ष जितेंद्र उतखडे याच्याविरुद्ध कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला.