शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

५० देशांचे नौदल भारताच्या किनारी

By admin | Updated: February 7, 2016 01:48 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी ‘आयएनएस सुमित्रा’ या जहाजावरून भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्याची आणि तयारीची पाहणी केली. ५० देशांचा सहभाग असलेल्या

विशाखापट्टणम : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी ‘आयएनएस सुमित्रा’ या जहाजावरून भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्याची आणि तयारीची पाहणी केली. ५० देशांचा सहभाग असलेल्या या भव्य अशा आंतरराष्ट्रीय संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय नौदलाचे ‘आयएनएस सुमित्रा’ हे खास जहाज राष्ट्रपतींसाठी आहे. तिन्ही सशस्त्र दलांचे सर्वोच्च सेनापती असलेल्या मुखर्जी यांच्यासोबत यावेळी ‘आयएफआर (इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्णू) २०१६’ या लढाऊ गलबतांची पाहणी करण्यासाठी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही लढाऊ गलबतांची ११ वी पाहणी आहे. भारतात अशा प्रकारच्या कवायती घेण्याची ही दुसरी वेळ आहे.या गलबतांची पाहणी केल्यानंतर प्रणव मुखर्जी म्हणाले की, ‘‘या उपक्रमात सहभागी होण्यासाठी जगातील ५० देशांनी आपल्या नौदलाची जहाजे किंवा प्रतिनिधी पाठविले आहेत. जगातील नौदल देशाबद्दलची आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी आणि नौदल कर्मचारी देश यांच्यातील नाते घट्ट करण्यासाठी असे उपक्रम राबविते. ही बाब आयएफआर २०१६ ने खूप जास्त प्रमाणात करून दाखविली आहे. आयएफआर २०१६ चा सगळा झोत हा भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्यावर होता.या उपक्रमात भारतीय किनाऱ्यावर जगातील ५० देशांनी सहभाग घेतला व त्यातून शांतता, सहकार्य आणि मैत्रीसाठी समुद्राचा वापर व्हावा, तसेच सागरी किनाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी भागीदारीचा विकास व्हावा या आमच्या सामाईक इच्छेला त्याने पावतीच दिली, असेही मुखर्जी म्हणाले.