शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षीय मुलाचा ‘नरबळी’; जमावाने मांत्रिकाला पेटविले

By admin | Updated: October 1, 2015 22:34 IST

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात देवाला प्रसन्न करण्यासाठी पाच वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचे उघडकीस येताच संतप्त जमावाने मांत्रिकाला खांबाला

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात देवाला प्रसन्न करण्यासाठी पाच वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याचे उघडकीस येताच संतप्त जमावाने मांत्रिकाला खांबाला बांधून पेटविल्याने खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेपोटी निष्पाप बालकाचा बळी घेणारा मांत्रिक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोकुरू हे छोटेसे गाव या घटनेमुळे सुन्न झाले आहे. ३० वर्षीय मांत्रिक तिरुमाला राव याने पाच वर्षांच्या मुलाचे शिर कापून ते रक्त भांड्यात गोळा करून घरात शिंपडण्याचा विधी पार पाडल्यानंतर नरबळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक एम. लक्ष्मण यांनी दिली. तिरुमाला याने या मुलाला अंगणवाडीतून आपल्या घरी नेले होते. मुलाची आई अंगणवाडीत गेली असता तिला तेथे मुलगा आढळून आला नाही. तिने विचारपूस करताच तो तिरुमाला याच्यासोबत गेल्याची माहिती मिळाली. लगेच गावकरी तिरुमालाच्या घरी धडकले असता तेथे कुलूप आढळून आले. गावकऱ्यांनी कुुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर या मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी तिरुमाला याला ओढत नेत खांबाला बांधले. रॉकेल ओतून पेटवून दिले. वेळीच धावलेल्या पोलिसांनी तिरुमाला याची सुटका केली. तो होरपळल्यामुळे गंभीर जखमी झाला असून त्याला ओंगोले येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)