शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी, एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थ्यांची गळती

By admin | Updated: August 6, 2015 02:09 IST

गेल्या तीन वर्षांत आयआयटी आणि एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थी बाहेर पडले. त्यामागे शैक्षणिक ताणासह विविध कारणे होती, अशी चिंता वाढविणारी

नवी दिल्ली : गेल्या तीन वर्षांत आयआयटी आणि एनआयटीमधून ४,४०० विद्यार्थी बाहेर पडले. त्यामागे शैक्षणिक ताणासह विविध कारणे होती, अशी चिंता वाढविणारी माहिती मंगळवारी अधिकृतपणे समोर आली आहे. ही माहिती देतानाच सरकारने योग्य त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत, असे मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.२०१२-१३ आणि २०१४-१५ या दोन वर्षांत विविध आयआयटींमधून २,०६०, तर तीन वर्षांच्या काळात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांमधून (एनआयटी) २,३५२ विद्यार्थी बाहेर पडले. विविध संस्था किंवा महाविद्यालयांमध्ये प्रवेश, वैयक्तिक आणि वैद्यकीय गरज, पदव्युत्तर शिक्षण घेताना नोकरी लागणे तसेच शैक्षणिक ताण न झेपणे यासारखी विविध कारणे त्यामागे आहेत, असे त्या लेखी उत्तरात म्हणाल्या. आयआयटी रुरकीमधून सर्वाधिक २२८, त्यापाठोपाठ आयआयटी खरगपूर (२०९) आणि आयआयटी दिल्ली (१६९) विद्यार्थी बाहेर पडले. आयआयटी रुरकीमधील ७३ विद्यार्थ्यांना गेल्या महिन्यात बडतर्फ करण्यात आल्याबाबत त्या म्हणाल्या, की या निर्णयाला आव्हान देण्यात आले असता न्यायालयाने सदर संस्थेचा निर्णय योग्य ठरविला आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची शैक्षणिक कामगिरी नव्हती. या विद्यार्थ्यांनी पुन्हा योग्य दर्जा मिळविला तरच त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाईल.दोन अपहृत प्रोफेसर्सना परत आणण्याची मागणी१लिबियात अपहरण झालेल्या दोन भारतीय प्रोफेसर्सना मायदेशी परत आणण्याची मागणी तेलगू देसमचे के. राममोहन नायडू यांनी शून्य तासाला लोकसभेत मुद्दा उपस्थित करताना केली. आंध्र प्रदेशमधील प्रो. गोपाल आणि त्यांचे तेलंगणामधील सहकारी अद्यापही अपहृतांच्या तावडीत आहेत. अन्य दोन प्राध्यापकांची मात्र सुटका करण्यात आली आहे.२ इराकमध्ये ३९ भारतीयांचे अपहरण झाल्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले होते. त्याच धर्तीवर प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांनी ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ‘राष्ट्रीय महिला साक्षरता दिवस’ म्हणून साजरा करण्याची मागणी केली. ३खासदार आणि माजी खासदारांच्या वाहनांसाठी देशभरात टोल आकारला जाऊ नये, अशी मागणी अण्णा द्रमुकचे सी. गोपालकृष्णन यांनी केली. राज्य सरकारच्या जाहिरातींमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरण्याला मुभा दिली जावी, असे याच पक्षाचे खा. पी. आर. सेंथीलनाथन यांनी म्हटले.