शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ मोहिमेसाठी ४४ भारतीयांची निवड

By admin | Updated: May 8, 2014 19:08 IST

मंगळावर वस्ती वसवण्याच्या 'मार्सवन' या संस्थेच्या २०२४ साली होणा-या मोहिमेसाठी इच्छुक असणा-यांपैकी ४४ भारतीयांची निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन टीम
लंडन, दि. ८ - मंगळावर वस्ती वसवण्याच्या 'मार्सवन' या संस्थेच्या २०२४ साली होणा-या मोहिमेसाठी इच्छुक असणा-यांपैकी ४४ भारतीयांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी इच्छुक असणा-या तब्बल ७०५ उमेदवारांना निवडण्यात आले असून त्यात २७ पुरुष व १७ महिलांचा समावेश आहे. यापैकी अवघ्या चार जणांनाच या मोहिमेवर पाठवण्यात येईल.
नेदरलँडस्थित मार्सवन या संस्थेने या मोहिमेकरता डिसेंबर २०१३ साली या संबंधी अर्ज मागवले होते. या उपक्रमासाठी तब्बल १४० हून अधिक देशांतून अर्ज आले असून, २० हजार भारतीयांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६२ अर्ज ग्राह्य धरण्यात आले होते. त्यातून निवडक उमेदवारांना पुढील चाचणीसाठी बोलवण्यात आले. नवी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, पुणे आणि तिरअनंतपुरम येथून अनेकांनी अर्ज पाठवले. 
या मोहिमेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मंगळावर राहावे लागणार असून त्यांना तेथे पाठवण्याचा खर्च 'मार्स वन' ही संस्था करणार आहे. अशा प्रकारची ही पहिलीच मोहिम असून या मोहिमे करता मार्च २०१४ पर्यंत उमेदवारांनी मेडिकल हेल्थ सर्टिफिकेट सादर करणे तसेच लोकांसाठी ऑन-लाईन मार्स वन अ‍ॅप्लीकन्ट प्रोफाइल बनवणे अशा दोन टास्क्स पूर्ण करण्याची अट संस्थेने घातली होती. ४१८ पुरूष व २८७ महिलांनी या दोन्ही टास्क्स यशस्वीरित्या पूर्ण केल्या असून त्यांचा पर्सनल इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. या उमेदवारांपैकी ३१३ उमेदवार अमेरिका, १८७ युरोपमधून, १३६ आशिया येथून, ४१ आफ्रिकेतून व २८ जण ओशेनिया येथून आहेत. 
'या मोहिमेच्या दुस-या टप्प्यासाठी उत्सुक असून, त्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांची आम्ही निवड करणार आहोत, असे या मोहिमेचे वैद्यकिय अधिकारी नोरबर्ट क्राफ्ट यांनी असे सांगितले.