शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

४0 हजार रुपयांची चिल्लर भरून रुग्णाचा केला डिस्चार्ज

By admin | Updated: November 12, 2016 02:57 IST

देशभर सध्या नोटांची प्रचंड मारामार असून, चलन तुटवड्यामुळे प्रत्येक जण जमेल त्या मार्गाने ५00 आणि १000 रुपयांचे सुटे मिळवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

कोलकाता : देशभर सध्या नोटांची प्रचंड मारामार असून, चलन तुटवड्यामुळे प्रत्येक जण जमेल त्या मार्गाने ५00 आणि १000 रुपयांचे सुटे मिळवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. मात्र पश्चिम बंगालच्या अलीपोरमधील एका रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाइकांनी ४० हजार रुपयांच्या बिलाची रक्कम चिल्लरमध्ये भरून पेशंटचा डिस्चार्ज मिळवला. सुकांत छाऊल असे रुग्णाचे नाव आहे.डेंग्यूने आजारी असलेल्या सुकांत यांना न्यू अलीपोर भागातील बी. पी. पोद्दार हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सुकांत यांना बुधवारी डिस्चार्ज देत असल्याचे सांगितले. पण डिस्चार्जपूर्वी ४० हजार रुपयांचे बिल जमा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. सुकांतच्या कुटुंबीयांनी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा भरण्यासाठी दिल्या. पण त्या चलनातून बाद झाल्याने ते स्वीकारण्यास व्यवस्थापनाने नकार दिला. पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा न स्वीकारल्याने कुटुंबीयांनी हॉस्पिटलला चेकने रक्कम देण्याचे ठरविले. पण चेक नको, रोख रक्कमच आणून भरा, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. अखेर सुकांतच्या कुटुंबीयांनी आपल्या सर्व नातेवाईक व मित्रांना व्हॉट्सअ‍ॅपवरून मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण जमा झाली ४० हजार रुपयांची नाणी. ही ४० हजारांची नाणी मोठ्या पिशवीत भरून, ते ती घेऊन रुग्णालयात गेले. नाण्यांची थैली बघून रुग्णालयाला धक्का बसला. त्यांनी चिल्लरमध्ये बिल स्वीकारण्यासही नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या कुटुंबीयांनी या चलनावर बंदी नाही. त्यामुळे तुम्ही त्या स्वीकारल्या नाहीत, तर आम्ही पोलिसात तक्रार करू, असे रुग्णालयाच्या प्रशासनाला सांगितले. या इशाऱ्यामुळे नरमलेल्या रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अखेर ती थैली स्वीकारली. सहा जणांनी मिळून तब्बल तीन तास बसून ही नाणी मोजली. ती रक्कम बरोबर ४0 हजार रुपये असल्याने त्यानंतर दुपारी तीन वाजता सुकांतला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. (वृत्तसंस्था)