शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे ४० मृत बछडे आढळले

By admin | Updated: June 2, 2016 02:56 IST

थायलंडमध्ये ‘टायगर टेम्पल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बौद्ध मठातील वाघांना हलविण्याच्या मोहिमेदरम्यान मठातील फ्रीजरमध्ये वाघाचे ४० मृत बछडे आढळून आले.

बँकाक : थायलंडमध्ये ‘टायगर टेम्पल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बौद्ध मठातील वाघांना हलविण्याच्या मोहिमेदरम्यान मठातील फ्रीजरमध्ये वाघाचे ४० मृत बछडे आढळून आले. वन्यजीवांचा छळ आणि तस्करीचा या मठावर आरोप आहे. पोलीस व वन्यजीव अधिकाऱ्यांनी टायगर टेम्पलमधील सर्व वाघांना हलविण्याची मोहीम सोमवारी सुरू केली. त्यामुळे हा मठ लोकांसाठी बंद करण्यात आला आहे. मठातील फ्रीजरमध्ये वाघांचे बछडे आढळून आल्यानंतर वन्यजीव विभाग या प्रकरणी नवे आरोप ठेवणार आहे. हे बछडे मृत्युमुखी पडले तेव्हा एक किंवा दोन दिवसांचे होते. वाघांच्या अवयवांचा चिनी औषधांत वापर करण्यात येतो. त्यामुळे त्यांना प्रचंड मागणी असते. दरम्यान, मठाने यापूर्वीच तस्करीचे आरोप फेटाळले आहेत. मठातील वाघांचा जनन मृत्यूदर तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. यापूर्वी बछडा मृत्यू पावल्यास त्याचा अंत्यसंस्कार केला जाई. अमली पदार्थ दिले जात असल्याचीही होती शंकाकांचनबुरी प्रांतातील या बौद्ध मठात १३० हून अधिक वाघ होते. लोक वाघांसोबत सेल्फी घेत. हा मठ आपल्या परिसराचा अभयारण्य म्हणून प्रचार करीत होता. मात्र, वन्यजीवांची तस्करी आणि त्यांच्या छळाचे आरोप झाल्यापासून तो वादग्रस्त बनला होता. मठातील भिक्खू वाघांची बेकायदा पैदास करीत आहेत, असा आरोप होत होता तसेच वाघांना अमली पदार्थ दिले जात असल्याची शंका होती.