शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी दिला विकासाचा ३ पी फॉर्म्यूला

By admin | Updated: August 12, 2014 11:38 IST

लेहमधील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी विकासाचा ३ पी फॉर्म्यूला मांडला.

ऑनलाइन टीम
लेह (जम्मू काश्मीर), दि. १२ -  लेहमधील वीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी विकासाचा ३ पी फॉर्म्यूला मांडला. प्रकाश, पर्यावरण आणि पर्यटन या तीन शक्तींचे नियोजन व विकास केल्यास केवळ लेह लडाखच नव्हे तर संपूर्ण भारताचा विकास होऊ शकतो असे मोदींनी म्हटले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी काश्मीर दौ-यावर आले असून या दौ-यात ते दोन विजनिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. यातील लेह येथील पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन करताना मोदींनी लेहलडाखच्या विकासाची ग्वाही दिली. 'लोकसभा निवडणुकीदरम्यान लेह लडाखच्या जनतेने मी पाठवलेल्या लिखीत भाषणावरही भरभरुन प्रतिसाद दिला. लेह लडाखमधील जनतेने दाखवलेले प्रेम मी व्याजासकट परत करीन' असे मोदींनी सांगितले. लेह लडाखमध्ये विशाल नैसर्गिक संपत्ती असून हा परिसर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करु शकतो. जम्मू काश्मीरच्या विकासासाठी आम्ही राज्यसरकारसोबत मिळून काम करु असे मोदींनी नमूद केले. जम्मू काश्मीरमध्ये केशर क्रांती घडवून आणण्यासोबतच हिमालय पर्वतरागांमधील राज्यांमध्ये ऑर्गेनिक शेती व्हावी आणि या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपठे उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. 
भ्रष्टाचाराविरोधात लढाई तीव्र करणार  
देशभरात भ्रष्टाचार वाढला असून भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा आणखी तीव्र करु अशी ग्वाही मोदींनी दिली.  या लढ्यासाठी आम्ही अन्य राजकीय पक्षांमधील भ्रष्टाचारविरोधात लढणारे नेते, प्रशासकीय अधिका-यांचीही मदत घेऊ असे मोदींनी जाहीर केले. ही लढाई जिंकल्यास देशातील गरिबीवरही मात करता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.