शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

३८ कोळसा खाणी सार्वजनिक क्षेत्राला

By admin | Updated: March 25, 2015 01:42 IST

नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन, डीव्हीसी आणि स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियासह केंद्र आणि राज्यांतील ३८ सार्वजनिक क्षेत्रांना सरकारने मंगळवारी ३८ कोळसा खाणींचे वाटप केले.

नवी दिल्ली : नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन, डीव्हीसी आणि स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियासह केंद्र आणि राज्यांतील ३८ सार्वजनिक क्षेत्रांना सरकारने मंगळवारी ३८ कोळसा खाणींचे वाटप केले. सरकारने ३३ कोळसा खाणींचा खासगी कंपन्यांना लिलाव केला. त्यातून त्याला दोन लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या लिलावातून सरकारला १.८६ लाख कोटी रुपये मिळतील असा अंदाज देशाच्या महालेखापालांनी (कॅग) व्यक्त केला होता हे विशेष. या लिलावानंतर सरकारने ३८ कोळसा खाणी दिल्या, असे कोळसा खात्याचे सचिव अनिल स्वरूप यांनी सांगितले.मूळ योजनेनुसार सरकार ४३ कोळसा खाणी देणार होते परंतु प्रत्यक्षात ३८ खाणींच निश्चित झाल्या. काही खाणींसाठी अर्जच आले नाहीत, असे स्वरुप म्हणाले. स्टील अ‍ॅथॉरिटीला दिलेली एकमेव सीतानला ही खाण वगळता अन्य सगळ््या खाणी या वीज निर्मिती क्षेत्राला देण्यात आल्या आहेत. सरकारच्या यादीनुसार ३८ खाणींपैकी आठ खाणी (बरजोरा,बरजोरा (उत्तर), गंगारामचाक, गंगारामचाक भदुलिया, तारा पूर्व आणि तारा पश्चिम, पचवारा उत्तर आणि कास्टा पूर्व) पश्चिम बंगाल वीज निर्मिती महामंडळाला मिळाल्या आहेत. कर्नाटक वीज महामंडळाला बारंज एक, दोन, तीन आणि चार आणि मनोरा दीप आणि किलोनी खाणी मिळाल्या. नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनने (एनटीपीसी) छट्टी बरियातू, छट्टी बरियातू (दक्षिण), केरनदरी, तलायपल्ली आणि दुलंगा या खाणी पटकावल्या. खरगा जॉयदेव खाण दामोदर व्हॅली कार्पोरेशनला मिळाली. राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगमला परसा पूर्व, कांता बसन आणि परसा खाणी मिळाल्या तर छत्तीसगढ राज्य वीज निर्मिती कंपनीला गारे पालमा विभाग तीन, गिधमुरी आणि पटोरिया खाणी मिळाल्या.च्ओडिशा कोळसा आणि वीज निर्मितीने मनोहरपूर व मनोहरपूर डीपसाईड खाण मिळविली. या ३८ खाणींपैकी बहुतेक खाणी या आधी ज्यांना मिळाल्या होत्या त्यांनाच आताही मिळाल्या आहेत. च्गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे वाटप रद्द केले होते. हे खाण वाटप निर्दोष झालेले नव्हते असे न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्या कोळसा खाणींचा आता लिलाव झाला आहे.