शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी’साठी ३६,००० कोटी

By admin | Updated: March 1, 2016 03:39 IST

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्यासाठी दीर्घकालीन योजना राबविणार असून

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात २०२२ सालापर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्यासाठी दीर्घकालीन योजना राबविणार असून, कृषी क्षेत्रासाठी ३५ हजार ९८४ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली. तसेच शेतकऱ्यांना वेळेत आणि पर्याप्त कर्जपुरवठा करण्यासाठी ८.५ लाख कोटी रुपयांवरून नऊ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, ही आजपर्यंतची सर्वांत मोठी रक्कम असल्याचेही त्यांनी सांगितले.देशातील लागवडीखालील क्षेत्र १४ कोटी १0 लाख हेक्टर आहे. त्यापैकी ४६ टक्के क्षेत्र सिंचनाखाली असून उर्वरित क्षेत्राच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. समतोल सिंचन वाढविल्याशिवाय आणि रासायनिक खतांचा माफक वापर केल्यानेच जमिनीचा पोत टिकणार आहे. यासाठी सरकारचे प्राधान्य आहेयेत्या पाच वर्षांत ८0 लाख ६0 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचप्रमाणे भूजलस्रोतांचे स्थायी व्यवस्थापन हा एक प्रमुख कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. सहा हजार कोटी रुपये प्रस्तावित खर्चाचा हा कार्यक्रम बहुस्तरीय निधीद्वारे राबविण्यात येईल, असेही जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्याच्या उद्देशाने कृषी कर्जावर सूट देण्यासाठी १५ हजार कोटी रुपये, नव्या पीक विमा योजनेसाठी पाच हजार ५०० कोटी रुपये, डाळींच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच मार्च २०१७ पर्यंत सर्व १४ कोटी शेतकऱ्यांना ‘मृदा आरोग्य कार्ड’ दिले जाणार असून ‘ एकात्मिक कृषी बाजार’ योजना येत्या १४ एप्रिलला सुरू करणार असल्याचे जेटली यांनी जाहीर केले. सिंचन क्षेत्रातील उत्पादन वाढविण्यासाठी ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’ सक्षम बनविली जाणार आहे. याअंतर्गत २८.५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. नाबार्डमधून २० हजार कोटी रुपये प्राथमिक निधीबरोबरच दीर्घकालीन निधी उपलब्ध केला जाणार आहे. सिंचन लाभ कार्यक्रम (एआयबीपी)साठी ८९ सिंचन योजना सुरू करणार आहे. यामुळे ८०.६ लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. या योजनांसाठी १७ हजार कोटी रुपये आणि पुढील पाच वर्षांसाठी ८६ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकार ३१ मार्च २०१७ पूर्वी किमान २३ सिंचन योजना पूर्ण करणार आहे. ते म्हणाले की, २०२२पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्याच्या दृष्टीने शासन या क्षेत्रातील हस्तक्षेपाबाबत नव्याने विचार करणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)