शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

केळी महामंडळात ३० सदस्य

By admin | Updated: February 29, 2016 22:03 IST

जळगाव- राज्यात नियोजीत केळी महामंडळात ३० सदस्य असतील. त्यात राज्याचे कृषि आयुक्त, कृषि विभागाचे प्रधान सचिव यांना पदसिद्ध स्थान दिले जाऊ शकते. तसेच केळी खरेदी विक्रीचे व्यवहार प्रमाणित करून त्याची नोंदणी बंधनकारक केली जाईल. अर्थातच केळी विपणाबाबत महामंडळाचे पूर्णत: नियंत्रण व नियमन असेल, असे संकेत मिळाले आहेत.

जळगाव- राज्यात नियोजीत केळी महामंडळात ३० सदस्य असतील. त्यात राज्याचे कृषि आयुक्त, कृषि विभागाचे प्रधान सचिव यांना पदसिद्ध स्थान दिले जाऊ शकते. तसेच केळी खरेदी विक्रीचे व्यवहार प्रमाणित करून त्याची नोंदणी बंधनकारक केली जाईल. अर्थातच केळी विपणाबाबत महामंडळाचे पूर्णत: नियंत्रण व नियमन असेल, असे संकेत मिळाले आहेत.
केळी महामंडळाची रचना, त्याची उद्दीष्टे व इतर मुद्द्यांबाबत राज्य शासन कृषि विभाग प्राथमिक स्तरावर चर्चा करीत आहे. राज्याच्या कृषि मंत्रालयाशी अजून अंतिम चर्चा झालेली नाही. परंतु महामंडळाची उद्दीष्टे कशी असावीत, जिल्हास्तरावर कशी रचना असावी, याची माहिती कृषि विभागाने मागितली आहे. ती पाठविली जाणार असल्याची माहिती आहे. या वृत्तास राज्य शासन कृषि विभागातील वरिष्ठांनी दुजोरा दिला आहे.
मुख्यालय जळगावातच
राज्यात जळगाव केळी लागवडीत आघाडीवर आहे. यानंतर सोलापूर, सांगली व इतर भागात केळी घेतली जाते. विदर्भात अकोला, बुलडाणामध्ये केळी घेतली जाते. केळी महामंडळाचे मुख्यालय मात्र जळगाव जिल्ह्यातच असेल, अशी माहितीही मिळाली आहे.

जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, सीईओ सदस्य
जिल्हास्तरावरही महामंडळाची समिती असेल. त्यात जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ यांना पदसिद्ध सदस्यत्व दिले जाईल. तर संबंधित जिल्ह्याची रचना लक्षात घेता अशासकीय सदस्यांची संख्या निर्धारित केली जाईल. पालकमंत्र्यांना या समितीवर सदस्यांची नियुक्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.

उद्दीष्टे अनेक
केळी महामंडळाची उद्दीष्टे काय असावीत यासंबंधी काही दिवसांपूर्वी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात केळी उत्पादक, बाजार समिती पदाधिकार्‍यांची बैठक आमदार हरिभाऊ जावळे यांनी घेतली. त्यातील सूचना लक्षात घेता केळी महामंडळाची उद्दीष्टे ठरणार आहेत. त्यात केळी क्षेत्र व उत्पादकतेमध्ये वाढ, प्रशासकीय नियंत्रण व कृषि विस्तार, विपणनाचे नियमन व नियंत्रण, कृषि विद्यापीठ व शासकीय यंत्रणा यांच्यात सांगड घालणे, केळी वाहतुकीसाठी शासन, रेल्वे व इतर विभागामध्ये समन्वय साधणे, केळी पिकासाठी आवश्यक वित्त पुरवठा व त्याचे नियोजन, केळी रोपांची गुणवत्ता व विकास तसेच त्यासंबंधी संशोधनाल प्राधान्य, केळी उत्पादकांना वीजपुरवठ्यासंबंधी सूसूत्रता आणणे, केळी उत्पादकांचे वार्षिक संमेलन भरविणे व प्रशिक्षण कार्यक्रमास प्रोत्साहन.

कोट-
केळी महामंडळाच्या उद्दीष्टांसंबंधी शासनाला माहिती सादर करायची आहे. अजून प्राथमिक अवस्थेत काम आहे. लवकरच ही माहिती पाठवू.
-अनिल भोकरे, अतिरिक्त व्यवस्थाप, वसुंधरा पाणलोट विभाग