शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

३० लाख मुस्लीमांनी सदस्य होऊन दिली भाजपाला साथ

By admin | Updated: June 4, 2015 13:54 IST

भारतीय जनता पार्टीच्या सदस्य मोहिमेला मुस्लीमांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत असून एकूण मिळून सुमारे ३० लाख मुस्लीमांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे

ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. ४ - भारतीय जनता पार्टीच्या सदस्य मोहिमेला मुस्लीमांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसत असून एकूण मिळून सुमारे ३० लाख मुस्लीमांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे भाजपा सत्तेत असलेल्या वा भाजपाचा चांगला प्रभाव असलेल्या राज्यांमधून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मिस कॉल द्या आणि भाजपाचे सदस्य व्हा या मोहिमेला सर्व स्तरावरील लोकांनी प्रतिसाद दिला असून मुस्लीमही मागे नसल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.
भाजपाच्या मायनॉरिटी सेलचे प्रमुख अब्दुल रशीद अन्सारी यांच्या सांगण्यानुसार याआधी भाजपाचे सदस्य असलेल्या मुस्लीमांची गणना केली गेली नव्हती परंतु आता मात्र ती दुपटीने वाढल्याचे दिसत आहे. नव्या सदस्य मोहिमेमध्ये मध्य प्रदेशातल्या ४ लाख मुस्लीमांनी, गुजरातमधल्या २.६ लाख, दिल्लीतल्या २.५ लाख, पश्चिम बंगालमधल्या २.३ लाख तर उत्तर प्रदेशातील १.७५ लाख मुस्लीमांनी भाजपाचे सदस्यत्व घेतल्याचे दिसून आले आहे. 
भाजपाची सध्याची एकूण सदस्य संख्या १० कोटी असून त्यापैकी ३० लाख म्हणजे ३ टक्के सदस्य मुस्लीम आहेत. ही संख्या १० टक्क्यापर्यंत वाढवण्याचा पक्षाचा मानस आहे. पक्षाचे सदस्य झाल्यानंतर त्यांना कार्यकर्ते बनवण्याचा प्रयत्न ही पुढली पायरी असून ती आव्हानात्मक असल्याचे अन्सारी यांनी मान्य केले. बूथ लेव्हलच्या चार ते पाच कार्यकर्त्यांमध्ये किमान एक मुस्लीम असावा असे धोरण आखण्यात येत असून त्यामुळे मुस्लीम सदस्य कार्यकर्ते म्हणून पक्षात विलीन होतील अशी योजना आहे. जर अल्पसंख्याकांना बरोबर घेण्याची ही योजना यसस्वी ठरली तर उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल इथे होणा-या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलाच फायदा होईल असा अंदाजही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.