शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

250 दलित कुटुंबं स्विकारणार इस्लाम ?

By admin | Updated: July 28, 2016 12:27 IST

तामिळनाडूमधील पझंगकल्‍लीमेडू आणि नागापल्‍ली गावातील 250 दलित कुटुंबांनी मंदिरात प्रवेश मिळत नसल्याने इस्लाम धर्म स्विकारण्याच्या निर्णय घेतला आहे

ऑनलाइन लोकमत - 
चेन्नई, दि. 28 - मंदिरात प्रवेश देत नसल्याने 250 दलित कुटुंबं इस्लाम धर्म स्विकारण्याच्या तयारीत आहेत. तामिळनाडूमधील पझंगकल्‍लीमेडू आणि नागापल्‍ली गावातील हे कुटंबं आहेत. गावातील काही कुटुंबांनी तर इस्लाममध्ये धर्मातरणही केलं आहे. 
 
पझंगकल्‍लीमेडू गावात एकूण 180 दलित कुटुंबं राहतात. मंदिरात 5 दिवस चालणा-या उत्सवात आम्हाला एक दिवस सर्व विधी करायला मिळावेत अशी त्यांची इच्छा होची. मात्र हिंदू धर्मियांनी नकार दिल्याने त्यांना परवानगी मिळाली नाही. ज्यामुळे दलित कुटुंबं नाराज आहेत, आणि त्यांनी इस्लाम धर्म स्विकारण्याचा गावातील 6 कुटुंबानी अगोदरच इस्लाममध्ये धर्मातरण केलं आहे. 
 
तामिळनाडू तौहीद जमात संघटनेने गावक-यांमध्ये कुरानची प्रत वाटण्यास सुरुवात केली असल्याची माहिती एका गावक-याने दिली आहे. तर ख्रिश्चन मिशनरीनेही ग्रामस्थांशी संपर्क साधला आहे. काही हिंदू संघटनांनीदेखील या दलित कुटुंबांशी संपर्क साधला असून हे पाऊल न उचलण्यातं आवाहन केलं आहे. तसंच दलित आणि हिंदूंमध्ये समेट घडवून आणण्याचाही प्रयत्न करत आहेत.  
 
पझंगकल्‍लीमेडू हे समुद्री किना-यावर वसलेलं एक गाव आहे. गावात एकूण 400 कुटुंबं राहतात ज्यांच्यातील 180 दलित आहेत. पझंगकल्‍लीमेडूपासून 240 किमीवर असलेल्या नागापल्‍ली गावातही दलितांशी भेदभाव झाल्याचं समोर आलं आहे. गावातील 70 कुटुंबांनी मंदिरात प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत धर्मांतरण करण्याचा शेवटचा मार्ग स्विकारला आहे. सरकार आणि प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. 'अनेक दिवस झाले आम्ही विनंती करत आहोत मात्र आम्हाला आमचे अधिकार मिळवून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं', स्थानिकाने सांगितलं आहे.