शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

२५ वाहनांचा अपघात

By admin | Updated: February 11, 2016 03:36 IST

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी २५ वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह

चंदीगड : हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी २५ वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह ५ जण ठार, तर १५ जखमी झाले. जिल्ह्यातील निलोखेडी गावाजवळ हा अपघात झाला, असे कर्नालचे पोलीस अधीक्षक पंकज नैन यांनी सांगितले. सकाळी दाट धुक्यांमुळे समोरचे न दिसल्याने एक कार उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. त्यानंतर त्या कारच्या मागून येणारी इतर वाहने एकापाठोपाठ एक समोरच्या वाहनांवर आदळत गेली. ट्रकच्या धडकेने तीन मुली ठारराय बरेली : ट्रकच्या धडकेने तीन किशोरवयीन मुली ठार झाल्या. येथील लालगंज कोतवाली भागात बुधवारी घडला. पोलीस भरतीसाठी पूजा, ज्योती (दोघीही १८) आणि पूनम (१६) धावण्याचा सराव करीत असताना ही दुर्घटना घडली. (वृत्तसंस्था)एकाच कुटुंबातील ४या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले असून त्यापैकी चौघे उत्तर प्रदेशातील एकाच कुटुंबातील आहेत. लग्नासाठी ते पंजाबला जात होते. गंभीर जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्ग स्वच्छ केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. दोन ट्रक्समध्ये रिक्षा येऊन सात जण ठार बहरामपूर (पश्चिम बंगाल) : दोन ट्रक्समध्ये व्हॅन रिक्षा चेंदली जाऊन सात जण ठार तर चार जण जखमी झाले. ही दुर्घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ३४ वरील आयहोरन येथे बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. हे दोन्ही ट्रक्स अतिशय वेगात असताना ही ११ प्रवाशांना घेऊन निघालेली व्हॅन रिक्षा त्यांच्यामध्ये सापडली.सर्व जखमींना जांगीरपूर उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर दोन्ही ट्रक्सचे चालक फरार झाले.कालव्यात पडलेल्या सहाही जवानांना पाणबुड्यांनी वाचविलेगाझियाबाद : कालव्यात पडलेल्या ट्रकमधील सहाही जवानांना स्थानिक पाणबुड्यांनी त्यांना वाचविले. हे जवान मेरठ लष्करी छावणीतील होते व दिल्लीला निघाले होते. त्यांना घेऊन जाणारा ट्रक येथील मुरादनगर भागातील गंगा कालव्यात पडला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.