शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

२४ तास अखंड वीजपुरवठा

By admin | Updated: July 14, 2016 03:14 IST

देशात सर्वांना २0१७ अखेर २४ तास वीज अखंड पुरवण्याचे मिशन केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतले आहे. ‘वन नेशन, वन ग्रीड’ घोषणेनुसार नॅशनल ग्रीडमार्फत २.२0 रुपये प्रतियुनिटच्या बेस दराने लिलावाद्वारे

नवी दिल्ली : देशात सर्वांना २0१७ अखेर २४ तास वीज अखंड पुरवण्याचे मिशन केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतले आहे. ‘वन नेशन, वन ग्रीड’ घोषणेनुसार नॅशनल ग्रीडमार्फत २.२0 रुपये प्रतियुनिटच्या बेस दराने लिलावाद्वारे सर्व राज्यांना हवा तसा अल्पकालिन वीजपुरवठा सध्या केला जात आहे. अनेक वर्षांनंतर देशात सध्या सरप्लस वीज उपलब्ध आहे, असे उद्गार केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी काढले. ऊर्जा विभाग देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. सर्वांना मुबलक वीज मिळावी, यासाठी आम्ही विशेष मेहनत घेत आहोत, असे नमूद करून गोयल म्हणाले, ‘ग्रामीण विद्युतीकरणाचा पाठपुरावा करताना वीज नसलेल्या गावांना जोडणे, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेद्वारा ७0१८ नव्या गावांचे विद्युतीकरण, कोळसा खाणींचा पारदर्शक लिलाव, खाण विकासासाठी उपाययोजना, अशा विषयात गेल्या २ वर्षांत आम्ही प्रगतीची शिखरे गाठली आहेत.’ १ लाख कोटी रुपयांचे उदय बाँडस जारी करून, दोन वर्षांत डिस्कॉमच्या उदय योजनेची यशस्वी वाटचाल झाली. वीजनिर्मितीत देशात ४६ हजार ५४३ मेगावॅटची नव्याने भर, गतवर्षी म्हणजे २0१५/१६ वर्षात अवघी २.१ टक्के विजेची तूट. २00८/९मध्ये ही तूट ११.१ टक्के होती. पारदर्शक लिलाव पद्धतीने कोळसा खाणी असलेल्या राज्यांना ३.४४ लाख कोटींचे उत्पन्न याखेरीज ७४ कोळसा ब्लॉक्सना त्याचा लाभ. कोल इंडियाने गेल्या २ वर्षांत कोळसा उत्पादनात ७.४ कोटी टनांची भर घातली, असेही गोयल म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)