शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ऑगस्टच्या अतिवृष्टीचा २२८ गावांना फटका, १६ हजार हेक्टरचे नुकसान

By admin | Updated: August 16, 2016 22:46 IST

शासनाला प्रस्ताव सादर : शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

शासनाला प्रस्ताव सादर : शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षानाशिक : जिल्‘ात १ ते ४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्‘ातील २२८ गावांमधील ३२ हजार ९४२ शेतकर्‍यांच्या १६ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तसा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.दरम्यान, शासनाला नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता ३२ हजार शेतकर्‍यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागली आहे. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान इगतपुरी व सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे झाले आहे.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्‘ात अतिवृष्टीमुळे अनेक गावांना फटका बसला होता. बागलाण तालुक्यात ३५, कळवण- ५७, नाशिक- ४२, इगतपुरी- १०, चांदवड- ४ अशा एकूण २२८ गावांमधील ३२ हजार ९४२ शेतकर्‍यांना फटका बसला होता. त्यात भात पिकाची सर्वाधिक लागवड झालेल्या त्र्यंबकेश्वर व सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यात सुरगाणा तालुक्यात २५ हजार २३७ शेेतकर्‍यांच्या ३८७६ हेक्टरवरील भात, सोयाबीन यांसह अन्य पिके मिळून सुमारे ४५२२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील १० गावांमध्ये ५ हजार २०९ शेतकर्‍यांच्या २६६० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे तसेच वरई, भाजीपालासह अन्य पिकांचे मिळून ३४०६ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. कळवण तालुक्यातील ५७ गावांमधील १५११ शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तसेच बागलाण, त्र्यंबकेश्वर, चांदवड आदि तालुक्यातही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला आहे. आता शेतकर्‍यांना नुकसानभरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)