२१... एटीएम कार्ड
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
एटीएमकार्डद्वारे ४० हजार रुपये लंपास
२१... एटीएम कार्ड
एटीएमकार्डद्वारे ४० हजार रुपये लंपासआरोपीस अटक : मौदा येथील घटनानागपूर : एटीएम कार्ड चोरून त्याचा वापर करीत ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना मौदा येथे नुकतीच घडली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी आरोपीस अटक केली.मोंटू अनिल कांबळे (२८, रा. मौदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, भाऊराव शंकर गाडबैल (३२, रा. मौदा) असे फिर्यादीचे नाव आहे. मोंटू हा भाऊराव गाडबैल यांच्याकडे किरायाने राहायचा. त्यामुळे त्याने भाऊराव गाडबैल यांचा विश्वास संपादन केला होता. भाऊराव यांचे मौदा येथील बँक शाखेत बचत खाते असून, बँकेने त्यांना एटीएम कार्ड दिले. त्यांना एटीएम कार्डचा वापर योग्य पद्धतीने करता येत नसल्याने ते वेळोवेळी मोंटूची मदत घ्यायचे. त्यांना या एटीएम कार्डचा पीन नंबर लक्षात राहात नसल्याने त्यांनी तो कार्डच्या मागे लिहून ठेवला होता. ही बाब मोंटूच्या निदर्शनास आली. दरम्यान, मोंटूने १४ जानेवारीपूर्वी भाऊराव गाडबैल यांचे सदर एटीएम कार्ड चोरले. एवढेच नव्हे तर, या एटीएम कार्ड व त्याच्या मागे लिहिलेेल्या पीन नंबरचा वापर करीत त्याने मौदा येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून ४० हजार रुपये काढले. ही बाब लक्षात येताच भाऊराव गाडबैल यांच्या तक्रारीच्या आधारे मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्योच फुटेजची तपासणी केली. खात्री पटताच आरोपी मोंटूला अटक केली. याप्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतितनिधी)***