शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

२०... मौदा... टोल

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

(फोटो)

(फोटो)
माथनी टोल नाक्यावर शिवसेनेचे आंदोलन
मूूलभूत सुविधांची निर्मिती करा : नागपूर ग्रामीण पासिंग वाहने टोल फ्री करण्याची मागणी
मौदा : नागपूर ग्रामीण पासिंगची (एमएच-४०) सर्व वाहने टोलमुुक्त करण्यात यावी तसेच या नाक्यावर रामटेकनजीकच्या नाक्याप्रमाणे विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसनेनेच्यावतीने नागपूर - भंडारा महामार्गावरील मौदा नजीकच्या माथनी येथील टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
खा. कृपाल तुमाने, माजी आ. आशिष जयस्वाल, जिल्हा परिषद सदस्य भारती गोडबोले व देवेंद्र गोडबोले यांच्या नेतृत्वात शिवसैनिक माथनी शिवारातील टोल नाक्याजवळ पोहोचले. त्यांनी विविध घोषणा देत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करायला सुरुवात केली. काहींनी नाक्यातील गेट अडवून धरले होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी बोलावण्याची आग्रही भूमिका घेतली होती.
परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण होताच पोलीस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वैनगंगा एक्स्प्रेस वे प्रा. लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी आंदोलनस्थळी आणले. या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांच्या मागण्यांवर विस्तृत चर्चा केली. त्यावर सदर अधिकारी मागण्या मान्य करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यावर अधिकाऱ्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या नाक्यावर नागपूर ग्रामीण पासिंगची सर्व वाहने टोलमुक्त करण्यात आल्याची घोषणा कृपाल तुमाने यांनी केली.
सदर आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. या आंदोलनात पांडुरंग बुराडे, वर्धराज पिल्ले, बबलू चिकटे, तापेश्वर वैद्य, अशोक झिंगरे, राधेश्याम हटवार, नरेश धोपटे, मनोज कोठे, वासू भोयर, रंजना धनजोडे, भगवान बावनकुळे, दिगांबर बांगळकर, नितेश वांगे, शिवा मोथरकर, धनराज चाफले, नरेंद्र भोयर, निंबार्ते, हरिदास मारबते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, मौदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (तालुका/प्रतिनिधी)
***