शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आगामी अर्थसंकल्पात अन्नधान्य व इंधनावरील अनुदानात २० टक्के कपातीचे संकेत

By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST

आगामी अर्थसंकल्पात अन्नधान्य व इंधनावरील अनुदानात २० टक्के कपातीचे संकेत

आगामी अर्थसंकल्पात अन्नधान्य व इंधनावरील अनुदानात २० टक्के कपातीचे संकेत
गुंतवणूकदार निराश होण्याची शक्यता

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये अन्नधान्य आणि इंधन यावरील अनुदानात (सबसिडी) २० टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात पूर्ण अनुदान कपात केली जाईल अशी मुक्त बाजारपेठेच्या समर्थकांची अपेक्षा आहे. परंतु अनुदानात केवळ २० टक्केच कपात केली जाणार असल्याने गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा पडणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीचा परिणाम म्हणून अनुदानात केवळ २० टक्के कपात केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान एकूण अनुदान बिल अंदाजे दोन खरब रुपयांनी कमी होऊ शकते, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
१ एप्रिलपासून प्रारंभ होणाऱ्या आर्थिक वर्षात इंधन सबसिडी २२०-२३० अब्ज रुपयांच्या दोन तृतीयांशने कमी होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाच्या किंमती प्रति बॅरल ६० डॉलरवर आल्यामुळे ही कपात करणे शक्य होणार आहे. वित्तमंत्री अरुण जेटली हे चालू आर्थिक वर्षात एकूण सबसिडी ४० अब्ज डॉलरवरून कमी करून ती ३२ अब्ज डॉलरपर्यंत आणतील, अशी अपेक्षा असल्याचे या सूत्रांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भाजपा केंद्रात सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारद्वारा सादर केला जाणारा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प असेल. या सरकारने गेल्या वर्षी जूनमध्ये आपला हंगामी अर्थसंकल्प मांडला होता. या अर्थसंकल्पात पूर्वाश्रमीच्या संपुआ सरकारच्याच योजनांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले होते.
मोदी सरकारच्या या पहिल्या अर्थसंकल्पामुळे गुंतवणूकदारांची मात्र निराशा होऊ शकते. सबसिडीत कपात स्वागतार्ह आहे. पण आम्हाला आणखी काही केले जाण्याची अपेक्षा आहे, असे के. आर. चोकसे सेक्युरिटीजचे प्रबंध संचालक देवेन चोकसे यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)